For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पायाने पुरुषांचे नाव लिहून करते कमाई

06:23 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
पायाने पुरुषांचे नाव लिहून करते कमाई
Advertisement

पैसे कमाविण्याची अजब पद्धत

Advertisement

सद्यकाळात पैसे कमाविणे फारसे अवघड नाही. केवळ पैसे कमाविण्याच्या पद्धतींविषयी तुम्ही ऐकले असेल. अनेक लोक साइड हसलच्या नावावर मोठी मेहनत करतात, परंतु त्यांना पैसे मिळत नाहीत. तर काही जण अजब गोष्टी करून पैसे कमावतात. सध्या एक युवती चर्चेत आली आहे. ही युवती केवळ पायांची छायाचित्रे विकून पैसे कमाविते. याचबरोबर ती पायाने अनोळखी पुरुषांची नावे लिहून ते कागद विकून मोठी कमाई करत आहे.

द टो गॅलली एका युवतीचे अकौंट असून तिने पैसे कमाविण्यासाठी अत्यंत अजब मार्ग शोधला आहे. या युवतीने स्वत:च्या पायांची छायाचित्रे तसेच व्हिडिओज तयार करत पैसे कमाविले आहेत. ती स्वत:च्या पायांनी कागदावर लिखाण करते आणि मग तो कागद पुरुषांना विकते. लोक याकरता तिला चांगले पैसे देखील देतात.

Advertisement

पायांनी डिझाइन तयार करणे

या युवतीला या कामासाठी 25 डॉलर्स ते 600 डॉलर्सपर्यंत (2 हजार ते 50 हजार रुपये) मिळतात. या पैशांद्वारे स्वत:चे स्टुडंट लोन फेडत आहे. तसेच घरभाडे देखील याच रकमेतून भरत असल्याचे या युवतीने सांगितले आहे. एका फोटोत ती लेस्टर नाव लिहिताना दिसून येते. नाव लिहिल्यावर हा कागद तिने संबंधित व्यक्तीला विकला असता तिला 300 डॉलर्स मिळाले. याचबरोबर ती नेल पॉलिशद्वारे देखील कागदावर नाव लिहून तो विकत असते. अनेकदा ती अन्य प्रकारचे संदेश लिहून लोकांना विकते.

लाखोंमध्ये आहेत व्हिडिओचे व्यूज

युवतीच्या व्हिडिओंना लाखो व्यूज मिळतात. अनेक लोक कॉमेंट करत तिला व्हिडिओला प्रतिसाद देतात. मी देखील हे काम करू इच्छिते असे एका युजरने म्हटले आहे. अखेर हे काम सुरू कसे केले जाते अशी विचारणा अन्य एका युजरने केली आहे. ही युवती फीट फाइंडर नावाच्या वेबसाइटद्वारे स्वत:च्या पायांनी तयार केलेल्या डिझाइनला ऑनलाइन विकत असते.

Advertisement
Tags :

.