सेनादलाचा लक्ष्य चहर विजयी
वृत्तसंस्था / बरेली
येथे सुरु असलेल्या वरिष्ट पुरुषांच्या मुष्टीयुद्ध चॅम्पियनशीप स्पर्धेत सेनादलाच्या विद्यमान विजेत्या लक्ष्य चहरने रेल्वेच्या साहीलचा 80 किलो वजन गटात पराभव केला.
या विजयामुळे लक्ष्य चहरचा आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा तसेच विश्व आणि आशियाई चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी भारतीय मुष्टीयुद्ध संघामध्ये समावेश राहिल. या विजयानंतर लक्ष्य चहरने 80 किलो वजन गटात दुसरी फेरी गाठली. पुरुषांच्या 60 किलो वजन गटात रेल्वेच्या गोविंद सहानीने जम्मू-काश्मिरच्या मोहम्मद आरीफचा पहिल्या फेरीत पराभव केला होता. त्यानंतर गोविंद सहानीने या वजन गटात दुसऱ्या फेरीत आसामच्या गौरव मुजुमदारचा 5-0 असा फडशा पाडला. गोविंद सहानीचा मोहम्मद आरीफवरील हा सलग दुसरा विजय आहे. 50 किलो गटात पंजाबच्या गोपीने तर 55 किलो गटात जयसेनदीप सिंगने तसेच 60 किलो गटात निखिल यांनी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविले. सदर स्पर्धा सोमवारी संपणार आहे. यापूर्वी दोनवेळा या स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद सेनादलाने पटकाविले होते.