For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सेनादलाच्या अमित कुमारला दोन पदके

06:00 AM Jun 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
सेनादलाच्या अमित कुमारला दोन पदके
Advertisement

वृत्तसंस्था/कोहीमा (नागालँड)

Advertisement

थायलंडमधील पटाया येथे झालेल्या 2025 च्या आशियाई इनडोअर नौकानयन (रोईंग) चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय सेनादलातील नायक अमित कुमारने दोन पदकांची कमाई केली. भारतीय सेनेत नाईक सुभेदार पदावर असलेल्या नौकानयनपटू अमित कुमारने सिंगल स्कूल 2000 मी. नौकानयन प्रकारात रौप्य पदक तर सिंगल स्कूल 500 मी. प्रकारात कांस्यपदक मिळविले. आशियाई इनडोअर नौकानयन स्पर्धा ही प्रतिष्ठेची समजली जात असून आशिया खंडातील विविध देशांचे अव्वल स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. गेल्या महिन्याच्या प्रारंभी द. कोरियातील गुमी येथे झालेल्या 26 व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय अॅथलिटसनी दर्जेदार कामगिरी करताना 24 पदकांची कमाई केली होती. भारताने या स्पर्धेत पदक तक्त्यात दुसरे स्थान मिळविले. तर चीन पहिल्या स्थानावर राहीला.

Advertisement
Advertisement
Tags :

.