लष्कर-दहशतवाद्यांमध्ये पुंछमध्ये गोळीबार
स्फोटकांसह दहशतवादी साथीदाराला अटक
श्रीनगर :
जम्मू-काश्मीरमधील पुंछच्या दोडी जंगलात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गुऊवारी रात्री उशिरा गोळीबार झाला. यामध्ये अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम राबवण्यात आली. याचदरम्यान, पुंछमध्येच सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीर गझनवी फोर्स (जेकेजीएफ) या दहशतवादी संघटनेच्या एका दहशतवाद्याला स्फोटकांसह अटक केल्याचे लष्कराने शुक्रवारी सकाळी सांगितले.
पुंछमधील पोथा बायपासवर गुऊवारी संध्याकाळी पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने संयुक्त नाकाबंदी केली होती. यावेळी एक संशयित व्यक्ती सुरणकोटकडून पोथाकडे येताना दिसली. त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी त्याला पकडले. त्याच्याकडे निळ्या रंगाची पिशवी सापडली असून त्यामध्ये तीन हातबॉम्ब, स्फोटक साहित्य आणि इतर गुन्हेगारी वस्तू होत्या. मोहम्मद शाबीर असे आरोपीचे नाव आहे. तो दरियाला नौशेरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.