For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोडामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरूच

06:22 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोडामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरूच
Advertisement

घुसखोरांकडून दोनवेळा गोळीबार : हुतात्मा जवानांवर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर, नवी दिल्ली

जम्मू-काश्मीरच्या दोडामध्ये शोधमोहीम सुरू असतानाच लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी दिवसभरात दोनदा गोळीबार झाला. घुसखोरांना टिपण्यासाठी लष्कराकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मंगळवारी येथे पॅप्टनसह 5 जवान हुतात्मा झाल्यानंतर शोध मोहिमेचा वेग आला आहे. दरम्यान, राजस्थानमधील हुतात्मा जवानांवर बुधवारी त्यांच्या मूळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील देसा भागात मंगळवारी रात्री उशिरा दहशतवादी आणि लष्करामध्ये दोनवेळा गोळीबार झाला. शोध मोहिमेदरम्यान देसा वनक्षेत्रातील कलान भाटा येथे रात्री 10:45 वाजता आणि त्यानंतर पंचन भाटा परिसरात मध्यरात्री 2 वाजता गोळीबार झाला. मात्र, यामध्ये कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.

15 जुलै रोजी लष्कर आणि पोलिसांना या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात येत असतानाच दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करून तेथून पळ काढला. घनदाट जंगलाचा आश्रय घेत घुसखोर पळून गेले. या हल्ल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोधमोहीम तीव्र केली. 17 जुलै रोजी तिसऱ्या दिवशीही परिसरात शोधमोहीम सुरू होती. ड्रोन आणि हेलिकॉप्टरच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Advertisement
Tags :

.