महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सेनाधिकाऱ्यांच्या मैत्रिणींवर बलात्कार

07:00 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेशातील घटना, सहलीला गेले असताना गुंडांनी केले दुष्कर्म 

Advertisement

वृत्तसंस्था/इंदूर

Advertisement

मध्यप्रदेशातील इंदूर जिल्ह्यात भारतीय सेनेचे दोन अधिकारी त्यांच्या मैत्रिणींसमवेत सहल करण्यासाठी गेलेले असताना त्यांच्यावर गुंडांनी हल्ला करुन लूटमार केली आणि त्यांच्या मैत्रिणींवर सामुहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना गेल्या मंगळवारी इंदूरनजीक असणाऱ्या जामगेट या पर्यटनस्थळी घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आहे. हे अधिकारी महू येथील सेनेच्या विद्यालयात प्रशिक्षणासाठी आलेले होते. ते गोळीबार मैदानानजीक असणाऱ्या जामगेट येथे त्यांच्या दोन मैत्रिणींसह संध्याकाळी वनक्षेत्रात फिरायला गेले होते. मध्यरात्रीपर्यंत ते पर्यटन करीत होते. याचवेळी काही सशस्त्र गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला व अधिकाऱ्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या मैत्रिणींचे अपहरण करुन त्यांच्यावर सामुहिक लैंगिक अत्याचार केले. गुंडांनी चौघांना लुटून त्यांच्याकडची रोख रक्कम व काही वस्तू लांबविल्या.

खंडणीही मागितली

गुंडांनी एक सैन्याधिकारी आणि त्याच्या मैत्रिणीचे अपहरण करुन त्यांना ओलीस ठेवल्याचीही घटना घडली. एक अधिकारी आणि त्याच्या मैत्रिणीला सोडण्यात आले. नंतर गुंडांनी अन्य अधिकाऱ्याची सुटका करण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार सादर करण्यात आली. पोलिसांनी त्वरित कारवाई करुन दोन गुंडांना ताब्यात घेतले आहे. अन्य चार गुंडांचा शोध घेतला जात आहे. मारहाणीत दोन्ही अधिकारी जखमी झाले आहेत.

घटनेमुळे प्रचंड खळबळ

सेनेच्या अधिकाऱ्यांना लुटण्याच्या आणि त्यांच्या मैत्रिणींवर अत्याचार होण्याच्या या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. अनेक प्रश्न या घटनेच्या संदर्भात उपस्थित केले जात आहेत. अधिकारी त्यांची अधिकृत शस्त्रे घेऊन गेले नव्हते काय असाही प्रश्न विचारला जात आहे. हा प्रकार गंभीर असून त्याची सखोल चौकशी केली जाईल, असे प्रतिपादन मध्यप्रदेश सरकारने केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article