For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाकिस्तानात सैन्याधिकाऱ्याचे दहशतवाद्यांकडून अपहरण

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
पाकिस्तानात सैन्याधिकाऱ्याचे दहशतवाद्यांकडून अपहरण
Advertisement

पेशावर : पाकिस्तानात एका वरिष्ठ सैन्याधिकाऱ्याचे दहशतवाद्यांनी त्याच्या घरातून अपहरण केले आहे. लेफ्टनंट कर्नल खालिद असे या अपहृत अधिकाऱ्याचे नाव आहे. सैन्याधिकाऱ्यासोबत त्याचे दोन बंधू आसिफ आणि फहद तसेच पुतण्या अब्राहम यांनाही दहशतवाद्यांनी स्वत:सोबत नेले आहे. खालिद हे रावळपिंडी कॅन्टोन्मेंट बोर्ड ऑफिसमध्ये कार्यरत होते. तर त्यांचा बंधू नॅशनल डाटाबेस अँड रजिस्ट्रेशन अथॉरिटीमध्ये अधिकारी आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.