महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

घुसखोरीविरोधात लढण्यास लष्कर नेहमीच सज्ज

06:42 AM Jan 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लष्करप्रमुखांची माहिती : शस्त्रसज्जता वाढवल्याचीही कबुली

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

सीमेपलीकडून घुसखोरीचे प्रयत्न केले जात असले तरी आमचे सैन्य कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताने अलीकडे बाहेरून प्रगत शस्त्रे आयात केली जात आहेत. तसेच भारतीय बनावटीची शस्त्रसज्जताही वाढत असल्याचे लष्करप्रमुख जनरल मनोजकुमार पांडे यांनी 76 व्या लष्कर दिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात बोलताना सांगितले.

 

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवायांवर लष्करप्रमुखांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम सीमेवरील परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र गेल्या काही महिन्यात अनेक भागात दहशतवादाच्या घटना पाहायला मिळाल्या. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी लष्करासह अन्य यंत्रणांची संयुक्त मदत घेऊन रोखठोक कारवाई केली जात आहे. दहशतवाद्यांना रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणा प्रभावीपणे कार्य करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

मणिपूरमध्ये शांततेसाठी प्रयत्न

जनरल पांडे यांनी मणिपूरमधील सद्यस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, सरकारची सक्रियता आणि भारतीय लष्कराच्या प्रयत्नांमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश येत आहे. या संवेदनशील वातावरणात आपल्या सैनिकांनी संयमाने काम करून नुकसान कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने आणखी ठोस पावले उचलली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आपला देश एका नव्या युगाच्या उंबरठ्यावर उभा आहे. आपण सर्वजण विकसित भारताची संकल्पना घेऊन पुढे जात आहोत. नजिकच्या काळात देशाला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होणार असून त्यासाठी सुरक्षित वातावरण आवश्यक आहे. सदर उद्दिष्ट साध्य करण्यात भारतीय लष्कर महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असेही लष्करप्रमुख पुढे म्हणाले.

राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये ‘ऑपरेशन सर्वशक्ती’

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्याचे पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावण्याच्या उद्देशाने भारतीय लष्कराने ऑपरेशन सर्वशक्ती सुरू केले आहे. यामध्ये भारतीय लष्कर पीर पंजाल पर्वतराजीच्या दोन्ही बाजूंनी कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे. उधमपूर येथील लष्कराचे मुख्यालय आणि लष्कराच्या उत्तरी कमांडच्या कडक देखरेखीखाली ही कारवाई सुरू करण्यात आली आहे. अलीकडच्या काळात पाकिस्तानच्या दहशतवादी गटांनी पीर पंजाल श्रेणीच्या दक्षिणेला विशेषत: राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये दहशतवादी कारवायांना खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला आहे. असे प्रयत्न रोखण्याचे प्रयत्न लष्कराकडून केले जात आहेत. पीर पंजाल रेंजच्या दोन्ही बाजूंना दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी ऑपरेशन सर्वशक्ती आयोजित केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले. या मोहिमेअंतर्गत जम्मू-काश्मीर पोलीस, सीआरपीएफ, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि गुप्तचर संस्था एकत्र काम करतील, असेही सूत्रांनी सांगितले. परिसरातील गुप्तचर यंत्रणा बळकट करण्यासाठीही पावले उचलण्यात आली आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article