महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

लष्करप्रमुखांनी घेतला काश्मीरमधील आढावा

06:33 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पदभार स्वीकारल्यानंतर सर्वप्रथम काश्मीर दौऱ्यावर : जवानांना दिला खास संदेश

Advertisement

वृत्तसंस्था/ पूंछ

Advertisement

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी बुधवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछला भेट दिली. त्यांनी पूंछ ब्रिगेड मुख्यालयात लष्कर, नागरी अधिकारी आणि माजी सैनिकांची भेट घेतली. लष्करप्रमुख झाल्यानंतर त्यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. नवीन लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या भेटीसाठी पूंछ-राजौरी भागाची निवड केली. बुधवारी जनरल द्विवेदी यांनी पूंछ-राजौरीमधील नियंत्रण रेषेजवळील भागात जाऊन लष्कराच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी लष्कराच्या ऑपरेशनल तयारीचा आढावा घेतानाच आवश्यक सूचनाही दिल्या.

काश्मीरमधील काही भाग गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. त्यामुळेच लष्करप्रमुखांनी पदभार स्वीकारताच काश्मीरला भेट देण्यास पसंती दर्शवली. सुमारे दोन दशके हे क्षेत्र सामान्यत: शांत मानले जात होते. मात्र, गेल्या 3-4 वर्षांपासून येथील दहशतवादी सुरक्षा दलांसोबतच सर्वसामान्य नागरिक आणि पर्यटकांनाही लक्ष्य करत आहेत. येथे सातत्याने घडणाऱ्या दहशतवादी घटनांमुळे गुप्तचर यंत्रणेवरही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्यावषी खुद्द तत्कालीन आणि विद्यमान संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी गुप्तचर यंत्रणा बळकट करण्याबाबत भाष्य केले होते. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले होते.

अलिकडच्या काळात भारतीय लष्कराने येथील सुरक्षा भक्कम करण्यासाठी अधिक सैनिक तैनात केले आहेत, परंतु आताही सैनिकांची संख्या पूर्वीइतकी नाही. तसेच, येथील लष्कर आणि जनता यांच्यातील संपर्कही कमकुवत झाला आहे. त्यामुळे आता स्थानिक लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि मानवी बुद्धिमत्तेचे जाळे निर्माण करण्यावर लक्ष केंद्रीत करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article