महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ग्रीसचे सैन्यप्रमुख लवकरच भारताच्या दौऱ्यावर

06:43 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Ç ÅÉÄÉÊÇ ÄÉÁÑÊÇÓ ÅÐÉÔÑÏÐÇ ÅÎÏÐËÉÓÔÉÊÙÍ ÐÑÏÃÑÁÌÌÁÔÙÍ ÊÁÉ ÓÕÌÂÁÓÅÙÍ èá óõíåäñéÜóåé ìå èÝìá çìåñÞóéáò äéÜôáîçò: ÅíçìÝñùóç áðü ôïí Õöõðïõñãü ÅèíéêÞò ¶ìõíáò, ê. ÉùÜííç ÊåöáëïãéÜííç, ãéá èÝìáôá áñìïäéüôçôÜò ôïõ.
Advertisement

ग्रीसचे सैन्यप्रमुख लवकरच भारताच्या दौऱ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/ अथेन्स

Advertisement

ग्रीसचे सैन्यप्रमुख पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ग्रीस आणि भारत यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होणार आहेत. जनरल दिमित्रियोस हूपिस हे संरक्षणाच्या मुद्द्यांवर एक समृद्ध अजेंड्यासोबत पुढील आठवड्यात भारताच्या दौऱ्यावर असणार आहेत. दोन्ही देश आधुनिक इतिहासात पहिल्यांदाच सैन्य सहकार्य कार्यक्रमावर स्वाक्षरी करणार आहेत. या कार्यक्रमात सैन्य, नौदल आणि वायुदलासोबत विशेष दलांच्या कर्मचाऱ्यांसोबत सराव आणि संयुक्त मोहिमांचा समावेश असेल.

दोन्ही देशांकडून यापूर्वीच संयुक्त प्रशिक्षणाचा एक विस्तृत कार्यक्रम तयार केला जात आहे. याच्या अंतर्गत ग्रीसचे सैन्य भारतात राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. अशाचप्रकारे भारताचे सैनिक ग्रीसमध्ये हिस्सा घेतील. ग्रीसकडून ‘इनिओचोस’ तर भारताकडून ‘तरंग शक्ति’ युद्धाभ्यासाचे आयोजन केले जाते. दोन्ही देश परस्परांच्या सैन्याभ्यासात सामील होण्याचा विचार करत आहेत. याचबरोबर सैन्य कर्मचाऱ्यांचे आदान-प्रदान, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाप्रकरणी सहकार्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रीसचे सैन्यप्रमुख हे भारतीय सैन्यप्रमुख मनोज पांडे यांच्यासमवेत सीडीएस अनिल चौहान यांच्यासोबत द्विपक्षीय तसेच क्षेत्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. शस्त्रास्त्रांच्या मुद्द्यांवरही चर्चा होणार आहे. चर्चेच्या केंद्रस्थानी लाल समुद्रातील ऑपरेशनमध्ये ग्रीसची भागीदारी, भारतीय नौदलासोबत सहकार्य आणि युक्रेनचा मुद्दा असेल.  भारत, मध्यपूर्व, युरोप कॉरिडॉरवरूनही चर्चा होण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या प्रारंभी ग्रीसचे पंतप्रधान क्यारीकोस मित्सोटाकिस हे भारताच्या दौऱ्यावर आले होते. तर त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रीसचा दौरा केला होता. दोन्ही देश परस्परांना महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर समर्थन करत आहेत. ग्रीससोबत संबंध वृद्धींगत करत भारत तुर्कियेला प्रत्युत्तर देऊ शकतो. तुर्किये आणि ग्रीस यांच्यात सायप्रसवरून वाद आहे. तर तुर्किये हा काश्मीर प्रकरणी पाकिस्तानची पाठराखण करणारा देश आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social_media
Next Article