For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लष्करप्रमुखांनी वाढवले सैनिकांचे मनोबल

07:05 AM May 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
लष्करप्रमुखांनी वाढवले सैनिकांचे मनोबल
Advertisement

जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचत ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल केले कौतुक

Advertisement

वृत्तसंस्था/श्रीनगर

भारतीय लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी गुरुवारी जम्मू काश्मीरमध्ये पोहोचत श्रीनगर, उरी आणि उंची बासी येथील अग्रेषित चौक्यांवर सैनिकांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांनी ऑपरेशनमध्ये सहभागी सैनिकांशी वैयक्तिक संवाद साधला. अपवादात्मक कामगिरी करणाऱ्या सैनिकांचे वैयक्तिकरित्या अभिनंदन करत त्यांनी जवानांना प्रोत्साहन दिले. या काळात, जनरल द्विवेदी यांनी लष्कराच्या चिनार कॉर्प्सच्या डॅगर डिव्हिजनसह इतर अनेक लष्करी तळांना भेट दिली. याप्रसंगी पाकिस्तानकडून होणाऱ्या सततच्या हल्ल्यांना आणि चिथावणीला ज्या पद्धतीने प्रत्युत्तर दिले त्याबद्दल सर्व सैनिक कौतुकास पात्र आहेत, असे लष्करप्रमुखांनी सैनिकांना सांगितले.

Advertisement

लष्करप्रमुखांचा हा दौरा कोणत्याही आढावा किंवा लष्करी तयारीसाठी नव्हता तर लष्कराच्या सर्व शाखा आणि सेवांमधील शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी असल्याचे लष्करी अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सैनिकांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी आणि त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी लष्करप्रमुखांनी जम्मू काश्मीरला भेट दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून चार रात्री सतत तोफांचा मारा सुरू होता. यालाही भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या उद्ध्वस्त केल्या. त्यांच्या चौक्यांजवळ बांधलेले अनेक दहशतवादी लाँच पॅड देखील उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अ•s अचूक आणि धाडसी कारवाईद्वारे नष्ट करणे ही एक महत्त्वाची लष्करी कामगिरी असल्याचे लष्करप्रमुखांनी सांगितले.

नागरिकांना मदत करण्यात लष्कराची मानवतावादी भूमिका

पाकिस्तानी सैन्याच्या नापाक आणि भ्याड गोळीबारामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या भारतीय सैनिकांच्या मानवतावादी भूमिकेचेही लष्करप्रमुखांनी कौतुक केले. भारतीय सैन्य केवळ सीमांचे रक्षण करत नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी नेहमीच तयार असते, असेही लष्करप्रमुख म्हणाले.

Advertisement
Tags :

.