महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एनआयएकडून शस्त्रतस्करी रॅकेट उध्वस्त

07:00 AM Feb 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : राष्ट्रीय अन्वेषण विभागाने (एनआयए) एक मोठे आंतरराष्ट्रीय शस्त्रतस्करी रॅकेट उध्वस्त केले आहे. मोठ्या प्रमाणात बाँब, स्फोटके आणि शस्त्रे एनआयएने टाकलेल्या धाडीत जप्त करण्यात आली असून या तस्करी टोळीच्या म्होरक्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याचे नाव लालगैहावमा असे असून तो मिझोरामचा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही कारवाई ईशान्य भारतात करण्यात आली आहे. म्यानमारमधून ही शस्त्रतस्करी केली जात होती.  गुप्तचरांनी दिलेल्या माहितीवरुन सापळा रचून या सूत्रधाराला पकडण्यात आले. ईशान्य भारतातील शांतता भंग करण्यासाठी ही टोळी कारस्थाने करीत होती. मणीपूरमधील समाजकंटकांना याच टोळीकडून शस्त्रे पुरविण्यात येत होती, असाही आरोप आहे. सूत्रधाराची कसून चौकशी केली जात असून नजीकच्या भविष्यकाळात आणखी टोळ्यांचा शोध लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article