कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतासोबत आर्मेनियाचा मोठा संरक्षण करार

06:38 AM Nov 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताकडून खरेदी करणार घातक लढाऊ विमान : पाक-अझरबैजानची उडणार झोप

Advertisement

वृत्तसस्था/ नवी दिल्ली

Advertisement

आर्मेनिया भारतासोबत आतापर्यंतचा स्वत:चा सर्वात मोठा संरक्षण करार करणार आहे. या संरक्षण कराराच्या अंतर्गत आर्मेनिया भारताकडून सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. भारताची सरकारी कंपनी एचएएल या विमानांची निर्मिती करणार आहे. आर्मेनियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा संरक्षण करार ठरणार आहे. या कराराची अंमलबजावणी 2027 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे.

भारतासोबतचा हा संरक्षण करार आर्मेनियासाठी अत्यंत खास आहे. या करारामुळे भारत आणि आर्मेनियादरम्यान संरक्षण संबंध मजबूत होतील. अझरबैजन पाकिस्तानकडून 40 जेएफ-17सी ब्लॉक-3 लढाऊ विमाने खरेदी करणार आहे. अझरबैजानच्या या खरेदीला आर्मेनिया भारतासोबत संरक्षण करार करत प्रत्युत्तर देणार आहे.

एचएएल करणार निर्मिती

एचएएल या विमानांना खासकरून आर्मेनियासाठी निर्माण करणार आहे. या विमानात भारतात निर्मित उत्तम एईएसए रडार लावला जाणार असून तो आकाशात उ•ाण करत असलेल्या विमानाचा थांगपत्ता लावण्यास सक्षम आहे. तसेच यात अस्त्र क्षेपणास्त्र जोडले जाणार असून ते अत्यंत दूर अंतरावरून शत्रूच्या विमानांना नष्ट करू शकते. याचबरोबर यात इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सिस्टीमही असेल. या सर्व वैशिष्ट्यांसह आर्मेनियाला मिळणारे सुखोई-30एमकेआय जगातील सर्वात अत्याधुनिक निर्यात वर्जनपैकी एक असणार आहे.

भारताचे सुखोई-30एमकेआर भारतीय वायुदलाच्या सर्वात विश्वसनीय आणि शक्तिशाली बहुउद्देशीय लढाऊ विमानांपैकी एक आहे. रशिया आणि भारताच्या हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने संयुक्तपणे या विमानाची निर्मितीकरत आहेत.

भारतीय वायुदलाची शान

सुखोई-30एमकेआय हे लढाऊ विमान 2002 पासून भारतीय वायुदलाची शान असून या विमानाला एचएएलकडून सातत्याने अधिक शक्तिशाली केले जात आहे. या लढाऊ विमानाला खास एएल-31एफपी इंजिन मिळाले असून ते आकाशात चित्तथरारक कामगिरी करण्याची शक्ती प्रदान करते. हे विमान 8 टनापेक्षा अधिक वजनी शस्त्रास्त्रs वाहून नेऊ शकते. तसेच हे लढाऊ विमान ब्राह्मोस क्षेपणास्त्राने युक्त आहे.

ब्राह्मोस-अस्त्रसारख्या क्षेपणास्त्रांनी युक्त

मागील 5 वर्षांमध्ये एचएएल आणि भारतीय वायुदलाने मिळून या विमानाला अनेक मोठे अपग्रेड दिले आहेत. यात स्वदेशी मिशन कॉम्प्युटर, रडार वॉर्निंग रिसिव्हर आणि इन्फ्रारेड सर्च-अँड-ट्रॅक सिस्टीम यासारखी नवी तंत्रज्ञाने जोडण्यात आली आहेत. 2023 मध्ये सुरू झालेल्या ‘सुपर सुखोई’ आधुनिकीकरण कार्यक्रमाचे लक्ष्य 150 हून अधिक विमानांना डिजिटल कॉकपिट, नव्या पिढीच्या सेंसरनी युक्त करणे आहे. तसेच या विमानांना अस्त्र मार्क-2 आणि मार्क-3 क्षेपणास्त्रंसोबत वापरण्यासाठी सज्ज केले जात आहे. भारत आता या विमानाला अन्य देशांना विकण्याच्या तयारीत आहे. एचएएल सक्रीय स्वरुपात इजिप्त, मलेशिया आणि आता आर्मेनिया यासारख्या देशांना याच्या निर्यातासाठी प्रयत्नशील आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article