For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पोलीस-निमलष्करी दलाचे शहरात सशस्त्र पथसंचलन

11:14 AM Apr 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
पोलीस निमलष्करी दलाचे शहरात सशस्त्र पथसंचलन
Advertisement

बेळगाव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी पोलीस व निमलष्करी दलाच्या जवानांनी शहराच्या मध्यवर्ती भागात निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी शक्तिप्रदर्शन केले. सायंकाळी राणी कित्तूर चन्नम्मा चौकापासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली. सीआरपीएफच्या जवानांबरोबरच खडेबाजार पोलीस स्थानकातील अधिकारी व पोलीस या पथसंचलनात सहभागी झाले होते. काकतीवेस, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली मार्गे खडेबाजार पोलीस स्थानकाजवळ पथसंचलनाची सांगता झाली.

Advertisement

Advertisement
Tags :

.