For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime : सासने कॉलनी परिसरात घरावर सशस्त्र हल्ला

03:04 PM Feb 19, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   सासने कॉलनी परिसरात घरावर सशस्त्र हल्ला
Advertisement

                         कोल्हापूरमध्ये विशाल मांगोरे आणि टोळीवर पोलिसांची कारवाई

Advertisement

कोल्हापूर- सासने कॉलनी आणि परिसरात वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने बिशाल मांगोरे आणि त्याच्या साथीदारांनी सचिन पोतदार याच्या घराबर मंगळवारी उशिरा सशस्त्र हल्ला केला. याप्रकरणी पोतदार यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर पोलिसांनी बिशाल मांगुरे, शहरुख शेख यांना अटक केली. सिध्देश भांदिगरे (बाबा जरगनगर), बिराज मोहिते, आदित्य दबडे यांच्यासह आणखी दोन अनोळखींवर गुन्हा नोंद केला आहे.

या तरुणांनी तोंडाला रुमाल बांधून लोखंडी हत्यार घेत घरावर हल्ला केला. खिडकीच्या काचा फोडल्या. पोलीस केस मागे घ्यावी, अन्यथा खानदान पेटवून देण्याची धमकी देत भांदिगरे याने शिवागाळ केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कोल्हापुरातल्या आयटीआयच्या मागील बाजूस असलेल्या सासने कॉलनी येथे वर्चस्व वादातून विशाल मांगोरे या तरुणांने गेल्या दोन वर्षात वारंवार शस्त्राचा धाक दाखवत प्रचंड दहशत निर्माण केली आहे. पोलिसांनी त्याच्यावर यापूर्वी कारवाई केल्या आहेत. तरीही कारवाईला न घाबरता त्याने बारंबार हे कृत्य केले आहे. या कॉलनी लगत असलेल्या एका रिकाम्या जागेवर विशाल मांगोरे याच्यासह त्याच्या गैंग मधील सदस्य दारू आणि गांजाची पार्टी करतात. पूर्वी या परिसरात कॉलनीतील महिला, पुरुष सायंकाळी फिरण्यासाठी जात होते. मात्र या टोळीच्या दहशतीमुळे स्थानिक नागरिकांना फिरणे बंद केले आहे. येथील नागरिकांना स्वतःच्या घरात जीव मुठीत धरून बसावं लागत आहे.

Advertisement

जुना राजवाडा पोलिसांनी या टोळीबर अंकुश निर्माण करण्यासाठी त्याची या कॉलनी आणि परिसरातून धिंड देखील काढली होती. मात्र त्यानंतर पुन्हा विशाल मांगुरे सक्रीय झाला आहे. गेल्याच मोक्काची कारवाई करा यापूर्वी सासने कॉलनीमध्ये घरावर तलवार हल्ला करण्यात आला होता. वाहनांची तोडफोड केली होती. भर बस्तीत अशा पद्धतीन वारंवार शास्त्राची धाक दाखवत हल्ला करणे, तोडफोड करणे, असे कृत्य करणाऱ्या या टोळीबर मोक्काची कारवाई व्हावी, अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

आठवड्यात त्याने या कॉलनीतील पोतदार यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला होता. त्यावेळी पोतदार यांच्या घरातील सदस्य सापडले नाहीत. म्हणून त्या रागातून दारातील दुचाकीची या टोळीनं प्रचंड तोडफोड केली होती. त्यानंतर मंगळवारी रात्री पुन्हा एकदा विशाल मांगुरे आणि त्याच्या साथीदारांनी पोतदार यांच्या घरावर सशस्त्र हल्ला केला. त्यामुळ या कॉलनीत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शोध पथकातील हवालदार प्रशांत घोलप, सागर डोंगरे, प्रशांत पांडव, अमर पाटील, प्रवीण सावंत यांना घटना स्थळी पाठवलं. रात्री उशिरापर्यंत शोध घेऊन त्यांनी विशाल मांगुरेला अटक केली. त्याला चांगलाच पोलिसी खाक्या दाखवण्यात आला.

Advertisement
Tags :

.