अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा
वृत्तसंस्था/मुंबई
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकरचा मुलगा, क्रिकेटपटू अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चांडोक हिच्यासोबत झाला आहे. सानिया या मुंबईतील नामांकित उद्योगपती रवी घई यांची नात असून, लवकरच तेंडुलकर घराण्याची सून होणार आहे. 25 वर्षीय अर्जुनचा साखरपुडा मंगळवारी गुपचूप पार पडला. सानिया अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. सानियाचे वडील रवी घई हे देखील सचिन तेंडुलकरचे मित्र आहेत. साखरपुडा समारंभ फारसा थाटामाटात आयोजित करण्यात आला नव्हता. दोन्ही कुटुंबातील जवळचे सदस्य आणि काही मित्रच या कार्यक्रमाला उपस्थित होते. सानियाचे कुटुंब मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतींचे कुटुंब आहे. घई इंटरकॉन्टिनेंटल मरीन ड्राइव्ह हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरीचे (कमी कॅलरीज असलेले आइक्रीम ब्रँड)s मालक आहेत. अर्जुन हा डावखुरा वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळतो. तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्स संघात आहे.