For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘बिलेनियर’ होणार अर्जुन रामपाल

06:35 AM Apr 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘बिलेनियर’ होणार अर्जुन रामपाल
Advertisement

हंसल मेहताच्या सीरिजमध्ये मुख्य भूमिका

Advertisement

धुरंधर 2 या चित्रपटाच्या यशात अर्जुन रामपालचाही हात आहे. चित्रपटात त्याने मेजर इक्बाल ही क्रूर भूमिका साकारली आहे. या चित्रपटाच्या यशादरम्यान अर्जुनला अनेक नवे प्रोजेक्ट्स ऑफर केले जात आहेत. अर्जुन लवकरच ‘बिलेनियर’ नावाच्या सीरिजमध्ये दिसून येणार आहे.

या सीरिजमध्ये अर्जुनची दमदार भूमिका असणार आहे. या सीरिजचे दिग्दर्शन हंसल मेहता आणि रॉबी ग्रेवाल करत आहेत. तर याची कहाणी अनुभव चोप्रा आणि शांतनु सागर यांनी लिहिली आहे. ऑलमाइटी मोशन पिक्चर अंतर्गत प्रभलीन संधू याच निर्मिती करत आहेत.

Advertisement

मी या प्रकल्पावरुन खरोखरच अत्यंत उत्सुक आहे. अशाप्रकारची भूमिका साकारण्याची संधी दररोज मिळत नाही, अशी संधी दिसून आल्यास ती गमवायची नसते. उत्तम फिल्ममेकर हंसल मेहता आणि रॉबी ग्रेवाल यांच्यासोबत काम करणे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण होण्यासारखे असल्याचे अर्जुनने म्हटले आहे. अर्जुनची ही सीरिज एमएक्स प्लेयरवर स्ट्रीम होणार आहे.

Advertisement
Tags :

.