For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मोहनलाल यांच्या चित्रपटात अर्जुन रामपाल

06:11 AM Oct 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
मोहनलाल यांच्या चित्रपटात अर्जुन रामपाल
Advertisement

अभिनेता अर्जुन रामपाल आता दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसून येणार आहे. अर्जुनने अलिकडेच मोहनलाल यांच्यासोबतची काही छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये दोन्ही कलाकार दिसून येत आहेत.

Advertisement

मोहनलाल यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची बाब आहे. मोहनलाल हे अत्यंत प्रतिभाशाली अन् प्रेरणादायी कलाकार असल्याचे अर्जुनने म्हटले आहे. दोन्ही कलाकार सध्या चित्रपट चित्रिकरणासाठी जॉर्जियाच्या त्बिलिसी येथे आहेत. अर्जुनने अलिकडेच ‘धुरंधर’ चित्रपटात मेजर इक्बाल ही भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर मोहनलाल यांचे मेजर महादेवन हे पात्र अत्यंत लोकप्रिय आहे. याचमुळे दोघांना एकत्र पाहून चाहत्यांची आगामी चित्रपटावरून उत्सुकता वाढली आहे.

मोहनलाल हे आगामी काळात ‘ऑपरेशन गंगा’ या चित्रपटात दिसून येणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू मोहन यांनी केले आहे. या चित्रपटात मोहनलाल यांच्यासोबत बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल, आदिल हुसैन आणि भाग्यश्री बोरसे दिसून येणार आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Advertisement

Advertisement
Tags :

.