अर्जुन-सानिया लवकरच विवाह बंधनात
06:28 AM Jan 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था/ मुंबई
Advertisement
भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच विवाहबद्ध होणार आहे. अर्जुन तेंडुलकर मार्च महिन्यामध्ये त्याची मैत्रिण सानिया चांडोकशी लग्न करणार असल्याचे समजते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये या जोडप्याचा वाङ्निश्चय सोहळा संपन्न झाला होता. सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध व्यापारी रवी घई यांची नात आहे. घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड क्षेत्रात प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि आइक्रीम ब्रँड ब्रुकलिन क्रीमरी यांची मालकी आहे. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका कौटुंबिक समारंभात पार पडल्याचे मीडिया रिपोर्ट्सद्वारे उघड झाले होते. नंतर सचिनने ‘आस्क मी एनीथिंग’ कार्यक्रमामध्ये अर्जुन आणि सानियाला साखरपुड्याची पुष्टी दिली होती.
Advertisement
Advertisement