For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अरिहंत संशोधन केंद्र दीपस्तंभ बनेल

12:03 PM Jul 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
अरिहंत संशोधन केंद्र दीपस्तंभ बनेल
Advertisement

संशोधन केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी आयसीएमआरचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय यांचे प्रतिपादन

Advertisement

बेळगाव : अरिहंत संशोधन केंद्र नाविन्यपूर्णतेने दीपस्तंभ बनणार आहे. त्याचबरोबर अत्याधुनिक संशोधनाला चालना देणार असून जागतिक वैद्यकीय समुदायामध्ये योगदान देणार आहे. प्रयोगशाळा आधारित संशोधन आणि वैद्यकीय सराव यांच्यामध्ये समन्वय महत्त्वपूर्ण आहे. अर्थपूर्ण प्रगती साध्य करण्यासाठी संशोधक आणि चिकित्सक यांच्यातील योग्य संवाद आणि सहकार्य आवश्यक असते. अरिहंत हॉस्पिटलच्या भविष्यातील संशोधन प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय पारंपरिक औषध संस्था (एनआयटीएम) चे दरवाजे कायम खुले आहेत, असे प्रतिपादन आयसीएमआर व बेळगाव एनआयटीएमचे संचालक डॉ. सुबर्णा रॉय यांनी केले आहे.

अरिहंत हॉस्पिटलच्या नूतन संशोधन केंद्राचे उद्घाटन बुधवारी डॉ. सुबर्णा रॉय यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. एम. डी. दीक्षित होते. डॉ. दीक्षित म्हणाले, रुग्णालयाच्या वैद्यकीय उत्कृष्टतेच्या वचनबद्धतेच्या नवीन अध्यायाची ही सुरुवात आहे. रुग्णालयातील संशोधन केंद्र रुग्णसेवेचा मार्ग मोकळा करून समाजाला महत्त्वपूर्ण लाभ देते. या संशोधन केंद्राचा सर्वसामान्यांना लाभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश दिवाण यांनी मनोगत व्यक्त केले. सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. किशोर भट यांनी संशोधन व प्रयोगशाळेची प्रमुख उद्दिष्टे अधोरेखित केली. रोगांमधील एनारोबिक बॅक्टेरियाचा सखोल अभ्यास व बहुऔषध प्रतिरोधक रोगजनकांच्या विरुद्ध नैसर्गिक संयुगांची प्रभाविता शोधणे समाविष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक अभिनंदन पाटील व युवानेते उत्तम पाटील यांनी हॉस्पिटलला शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. निखिल दीक्षित, डॉ. वरदराज गोकाक, डॉ. सूरज पाटील, डॉ. संजीव आर. टी., डॉ. अंबरीश नेर्लीकर, डॉ. श्रीशैल हिरेमठ, डॉ. युवराज यड्रावी, डॉ. आराधना छत्रे, डॉ. अमृता जोशी, डॉ. प्रशांत एम. बी., डॉ. अविनाश लोंढे, मल्लेश यड्डी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. डॉ. आरजू नुरानी यांनी सूत्रसंचालन केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.