For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शिवकुमारांच्या दिल्ली दौऱ्याविषयी तर्कवितर्क

06:59 AM Feb 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
शिवकुमारांच्या दिल्ली दौऱ्याविषयी तर्कवितर्क
Advertisement

मुख्यमंत्रिपद हस्तांतराविषयी काँग्रेसश्रेष्ठींची भूमिका जाणून घेणार

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या हस्तांतरावरून उपस्थित झालेला मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे आसाम विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नवी दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, त्यांच्या दिल्ली दौऱ्याविषयी सत्ताधारी पक्षातूनच तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत. खुद्द शिवकुमार यांनीच अधिकार वाटपाच्या मुद्द्यावर मी गोंधळलेला नाही. सिद्धरामय्या आणि मी काय चर्चा हे केली हे आम्हालाच ठाऊक. लपूनछपून बोललेलो नाही. वरिष्ठांच्या उपस्थितीत आम्ही चर्चा केली आहे, असे वक्तव्य केले आहे.

Advertisement

मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे विविध खात्यांची अर्थसंकल्पपूर्व बैठका घेत आहेत. असे असतानाच बैठकांत सहभागी न होता उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार दिल्लीला गेल्याने उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांनी सोमवारी दिल्ली दौऱ्याविषयी बोलताना, दिल्लीला राजकारणासाठी भेट देत आहे. आपल्या नेत्यांची भेट घेणे हे माझे कर्तव्य आहे. या भेटीवेळी मी वरिष्ठांना आमछया सर्व अडचणी, दु:ख, व्यथा आणि इच्छा सांगेन, अशी प्रतिक्रिया दिली होती.

मंगळवारी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी बेंगळूरमधील निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार म्हणाले, मी दिल्लीला जात असून सर्व वरिष्ठ नेत्यांची भेट घेईन. ज्यांची भेट शक्य आहे, त्यांची भेट घेईन. अधिकार वाटपाविषयी आमच्यात गोंधळ नाही. सिद्धरामय्या आणि मी एकत्र चर्चा केली आहे. याविषयी इतरांनी तणावाखाली वावरणे किंवा विधाने केल्याने कोणताही फायदा नाही. अधिकार वाटप, नेतृत्व बदलासंबंधी मंत्री, आमदार व नेत्यांनी वक्तव्ये केल्याने पक्षाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचेल. सर्वांनी याबाबत मौन बाळगावे, अशी सूचना एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी  दिली आहे. या सूचनेचे आम्ही पालन केले पाहिजे.

आम्ही नेतृत्वाच्या मुद्द्यावर भाष्य केल्याने नोटीस जारी करण्यात आली. यतिंद्र सिद्धरामय्या यांना नोटीस बजावलेली नाही. आम्हाला नोटीस दिल्याप्रमाणे इतरांनाही नोटीस बजावावी, अशी मागणी रामनगरचे काँग्रेस आमदार इक्बाल हुसेन यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार यांनी हायकमांडला विचारूया, इतकेच भाष्य करून अधिक बोलणे टाळले.

यतिंद्र यांच्याविषयी तक्रार करणार?

शिवकुमारांचे दोन दिवस दिल्लीत वास्तव्य राहणार आहे. या दौऱ्यात ते काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला यांची भेट घेतील. या नेत्यांकडे ते राज्यातील नेतृत्व बदलासंबंधी वरिष्ठांची स्पष्ट भूमिका काय आहे, हे जाणून घेतील. त्याचप्रमाणे सिद्धरामय्या हेच मुख्यमंत्रिपदी पाच वर्षे राहतील असे सातत्याने विधान करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पुत्र व विधानपरिषद सदस्य यतिंद्र सिद्धरामय्या यांच्याविषयी तक्रार करण्याची शक्यता आहे.

...तर मीही दिल्लीला जाईन!

डी. के. शिवकुमार हे दिल्लीला गेले आहेत. या बाबतीत मला कोणताही कॉल आलेला नाही. एखाद्या वेळेस कॉल आला तर मीही दिल्लीला जाईल. मी सिद्धरामय्या आहे, लपूनछपून बोलत नाही. हायकमांडसमोर बोलणे झाले आहे. त्यावर भाष्य करणार नाही. अर्थसंकल्पपूर्व बैठका आहेत. शिवकुमारांनी मला पत्र लिहिले असून आसाम निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीला जात असल्याने त्यांनी सांगितले आहे.

- सिद्धरामय्या, मुख्यमंत्री

Advertisement
Tags :

.