For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kurundwad Crime | ऑर्डर घेताना वाद, थेट कोयत्याने सपासप वार; कुरुंदवाड येथील हॉटेल अभिषेक मधील घटनेने परिसर हादरला!

10:28 AM May 27, 2026 IST | NEETA POTDAR
kurundwad crime   ऑर्डर घेताना वाद  थेट कोयत्याने सपासप वार  कुरुंदवाड येथील हॉटेल अभिषेक मधील घटनेने परिसर हादरला
Advertisement

                            कुरुंदवाडमध्ये बिअर बारमध्ये कोयत्याने हल्ला, तिघे गंभीर

Advertisement

कुरुंदवाड : कुरुंदवाड येथील हॉटेलअभिषेक बिअर बार अँड परमिट रूममध्ये किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी कोयता व एडक्याने हल्ला करून तिघांना गंभीर जखमी केल्याची घटना संध्या. ७ च्या सुमारास घडली.या प्रकरणी पवन काळे, पवन कित्तुरे व अमन झांजे (सर्व रा. कुरुंदवाड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात निखील वसंत शिकलगार (वय २३, रा. माळभाग, कुरुंदवाड), गजानन तुकाराम जमदाडे आणि अभिषेक प्रदीप बंडगर हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी हॉटेलमध्ये आले
असता ऑर्डर घेण्याच्या कारणावरून त्यांचा वेटर निखील शिकलगार याच्याशी वाद झाला. यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

Advertisement

प्रकार वाढत असल्याचे पाहून हॉटेल मालक अभिषेक बंडगर व त्यांचा मित्र गजानन जमदाडे हे मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले. मात्र आरोपींनी त्यांनाही मारहाण केली. दरम्यान, पवन कित्तुरे याने कोयत्याने निखील शिकलगार यांच्या चेहऱ्यावर व हातावर वार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अमन झांजे याने एडक्याने अभिषेक बंडगर यांच्या हातावर घाव घातला, तर पवन काळे याने गजानन जमदाडे यांच्या दिशेने काचेची बिअर बाटली फेकून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.