For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक केल्याने वादावादी

11:14 AM Jun 22, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुचाकीद्वारे प्रवासी वाहतूक केल्याने वादावादी
Advertisement

रिक्षा चालकांनी घेतला आक्षेप

Advertisement

बेळगाव : रिक्षा चालक आणि दुचाकीद्वारे सेवा देणारे रायडर्स यांच्यातील संघर्ष काही कमी होताना दिसत नाही. रिक्षा चालकांनी वेळोवेळी विरोध करूनदेखील दुचाकीद्वारे रायडर्स प्रवाशांना ये-जा करण्याची सेवा देत असल्याने बेळगाव रेल्वे स्थानकात जोरदार वादावादी झाली. कोणत्याही रायडर्सने शहरात सेवा देऊ नये, अशी सूचना रिक्षा चालकांनी दिली. शेवटी हा वाद रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचला. चारचाकी भाडे तत्त्वावर देणाऱ्या कंपन्यांनी आता दुचाकी रायडर्स उपलब्ध केले आहेत. मागील दीड ते दोन वर्षांपासून ही सेवा शहरासह उपनगरात देण्यात येत आहे. परंतु यामुळे रिक्षाचे भाडे कमी होत असून या रायडर्स सेवेला कोणतेही बंधन नसल्याचे कारण देत ते तत्काळ बंद करावे, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. शनिवारी एक दुचाकी रायडर प्रवाशाला घेऊन रेल्वे स्थानकात पोहोचला. त्याला रिक्षा चालकांनी जोरदार आक्षेप घेतला. रिक्षा चालकांची संख्या वाढल्याने अखेर हा वाद रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचला. कोणत्याही रायडर्सला शहरात प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी रिक्षा चालकांनी केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.