For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अर्जेंटिना बचावला, इजिप्तवर नाट्यामय विजय

06:58 AM Jul 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
अर्जेंटिना बचावला  इजिप्तवर नाट्यामय विजय
Advertisement

3-2 गोलफरकाने मात, दोन गोलांच्या पिछाडीनंतर रोमेरो, मेस्सी, एंझोमुळे उपांत्यपूर्व फेरीची वाट मोकळी

Advertisement

वृत्तसंस्था, अटलांटा : मंगळवारी ‘मर्सिडीज-बेंझ स्टेडियम’वर झालेल्या सामन्यात एंझो फर्नांडिसने ‘स्टॉपेज टाइम’मध्ये गोल करत अर्जेंटिनाला इजिप्तविऊद्ध 3-2 असा अविश्वसनीय विजय मिळवून दिला आणि विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित करून दिले.

गतविजेता अर्जेंटिना संघ सुऊवातीला 2-0 असा पिछाडीवर पडला होता आणि तो स्पर्धेबाहेर पडणार की काय, अशी भीती त्या देशाच्या फुटबॉल रसिकांना वाटू लागली होती. मात्र, त्यानंतर क्रिस्तियान रोमेरो आणि लायोनेल मेस्सी यांनी अवघ्या चार मिनिटांच्या अंतरात दोन गोल करत अर्जेंटिनाला सामन्यात परत आणले.

Advertisement

पहिल्या सत्रामध्ये मेस्सीला गोल करण्याची एक संधी हुकली. त्याची पेनल्टी इजिप्तचा गोलरक्षक मोस्तफा शोबीर याने अडवली. तसेच संघ 0-1 असा मागे पडलेला असताना त्याचा एक फटका गोलपोस्टला लागला. मेस्सीचा विश्वचषक कारकिर्दीतील 21 वा गोल 83 व्या मिनिटाला गोन्झालो मोंटिएलच्या साहाय्याने झाला, या गोलमुळे सामना 2-2 असा बरोबरीत आला आणि 19 व्या मिनिटाला हुकलेल्या पेनल्टी किकची भरपाई झाली.

अर्जेंटिनाचा सामन्यातील पहिला गोल 79 व्या मिनिटाला रोमेरोने हेडरद्वारे केला होता. त्यात मेस्सीने साहाय्य केले होते. त्यानंतर काहीच मिनिटांत मेस्सीने हा गोल नोंदवला. त्यापूर्वी 15 व्या मिनिटाला यासर इब्राहिमने हेडरद्वारे गोल करत इजिप्तला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 67 व्या मिनिटाला हैसम हसनच्या साहाय्याने मुस्तफा झिकोने इजिप्तसाठी दुसरा गोल केला. 2-2 अशी बरोबरी असल्याने सामना अतिरिक्त वेळेत जाणार की काय असे वाटले होते. मात्र एंझोने स्टॉपेज टाईममध्ये (90+3) क्षणी गोल करून अर्जेंटिनाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Advertisement
Tags :

.