महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इक्वेडोरला पेनल्टीवर 4-2 ने नमवून अर्जेंटिना उपांत्य फेरीत

06:48 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ ह्युस्टन

Advertisement

लिओनेल मेस्सीने कोपा अमेरिकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील इक्वेडोरविऊद्धच्या सामन्यात शूटआउटमध्ये अर्जेंटिनाची पहिली पेनल्टी किक घेण्यासाठा जेव्हा पाऊल उचलले तेव्हा 2022 च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात फ्रान्सवर विजय मिळवताना त्याने जसा फटका हाणला होता तसाच त्याचा आविर्भाव होता. मात्र  यावेळी मेस्सीचा फटका क्रॉस बारवर आदळल्याने संघाचा उपांत्य फेरीचा प्रवास धोक्यात आला होता. पण त्याला गोलरक्षक एमिलियानो मार्टिनेझवर विश्वास होता, ज्याने अर्जेंटिनाच्या सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका विजेतेपद मिळविण्याच्या आशा जिवंत ठेवल्या.

Advertisement

मार्टिनेझने अँजेल मेना आणि अॅलन मिंडा यांचे शूटआउटचे प्रयत्न थांबवले आणि अर्जेंटिनाने गुऊवारी रात्री 1-1 अशा बरोबरीनंतर पेनल्टी किकवर 4-2 असा विजय मिळवून कोपा अमेरिकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस्रया सत्राच्या दुखापतीच्या वेळेत अर्जेंटिनावर इक्वाडोरने गोल केला. मात्र त्यांनी नंतर उसळी घेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सलग तिसरे मोठे विजेतेपद मिळवण्याच्या मार्गावर असलेल्या अर्जेंटिनाने सलग पाचव्यांदा कोपा अमेरिकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article