महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्जेंटिनाची कॅनडावर 2-0 ने मात

06:06 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही गोलांसाठी मेस्सीचे साहाय्य

Advertisement

वृत्तसंस्था/ अटलांटा

Advertisement

अर्जेंटिनाने कॅनडावर 2-0 असा विजय मिळवून कोपा अमेरिकाचे विजेतेपद राखण्याच्या आपल्या मोहिमेची उत्साहवर्धक पद्धतीने सुऊवात केली आहे. लिओनेल मेस्सीचा या दोन्ही गोलांमध्ये सहभाग राहिला. त्याने पुरविलेल्या चेंडूमुळे 49 व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझचा गोल झाला. त्यानंतर त्याने 88 व्या मिनिटाला लॉटारो मार्टिनेझला गोल करण्यासाठी साहाय्य केले.

2021 ची कोपा अमेरिका आणि 2022 चा विश्वचषक जिंकल्यानंतर अर्जेंटिना सलग तिसरे मोठे विजेतेपद मिळविण्याच्या प्रयत्नात आहे. दक्षिण अमेरिकेतील ही स्पर्धा दुसऱ्यांदा अमेरिकेत हलविण्यात आली असून मेस्सीने त्याच्या 35 व्या सामन्यासह कोपा अमेरिकेत एक विक्रम प्रस्थापित केला. 1941 ते 53 दरम्यान खेळलेल्या चिलीच्या सर्जियो लिव्हिंगस्टोनपेक्षा तो आता एका सामन्याने पुढे गेला आहे. त्याशिवाय मेस्सीने 18 व्या गोलासाठी साहाय्य करून स्वत:चा विक्रम वाढवला.

सोमवारी 37 वर्षांच्या झालेल्या मेस्सीने पहिल्या गोलाची वाट मोकळी करून देताना थ्रो-इननंतर अॅलेक्सिस मॅकअलिस्टरला बचावफळी भेदून हेडरद्वारे पास दिला. सदर मिडफिल्डरने धावत येणारा गोलरक्षक मॅक्सिम क्रेप्यूला धडक देतानाच अल्वारेझला पास दिला. अल्वारेझसमोर गोलपोस्ट अक्षरश: रिकामा होता आणि त्याने 32 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील आपला आठव्या गोलाची नोंद सहज केली. अर्जेंटिना मंगळवारी ईस्ट रदरफोर्ड, न्यू जर्सी येथे चिलीशी खेळेल, त्यानंतर 29 जून रोजी मियामी गार्डन्स, फ्लोरिडा येथे पेरूविऊद्ध खेळून त्यांची पहिली फेरी संपेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article