For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘के पॉप डेमन हंटर’ फेम आर्डेन विवाहबद्ध

06:10 AM Jul 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘के पॉप डेमन हंटर’ फेम आर्डेन विवाहबद्ध
Advertisement

स्वत:चा परिवार, निकटवर्तीय आणि मित्रांच्या उपस्थितीत अभिनेत्री आर्डेन चो हेने इटलीत क्रिस्टोफरसोबत विवाह केला आहे. विवाह आणि त्यानंतरच्या जल्लोषाचा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या विवाहसोहळ्यावेळी आर्डेन ही पारंपरिक कोरियन पोशाख हानबोकमध्ये दिसून आली. आर्डेनचा पती एक ऑर्थोपेडिक सर्जन आहे. आमच्या विवाहाच्या सर्वात स्मरणीय क्षणांपैकी एक, इटलीत सर्वांचे स्वागत ‘हानबोक’ सेलिब्रेशनसोबत करण्याचे माझे स्वप्न होते. स्वत:चे मित्र आणि कुटुंबीयांना या पारंपरिक कपड्यांमध्ये पाहणे स्वप्नवत होते. सर्वांनी आमच्या संस्कृतीच्या या हिस्स्याला अत्यंत आनंदासह स्वीकारले आहे अशी कॅप्शन तिने व्हिडिओला दिली आहे. आर्डेनला मागील वर्षी क्रिस्टोफरने प्रपोज केले होते. याची घोषणा अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर केली होती.

Advertisement

Advertisement
Tags :

.