For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तिरंदाजी : गणेश मणिरत्नम उपांत्यपूर्व फेरीत

06:33 AM Sep 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
तिरंदाजी   गणेश मणिरत्नम उपांत्यपूर्व फेरीत
Advertisement

वृत्तसंस्था/ नागोया,

Advertisement

गणेश मणिरत्नम थिरुमुरुने आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात आपल्याच देशाच्या साहिल जाधवविरुद्धच्या रोमांचक लढतीत 149-148 असा विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दोन भारतीय खेळाडूंनी त्यांच्या सुरुवातीच्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात केली.  साहिल जाधवने मंगोलियाच्या जामियांगोम्बो पुरेवदोर्जला 149-137 असे हरवून सर्व पाच सेट जिंकले. दुसऱ्या 1/16 एलिमिनेशन फेरीत गणेशने इंडोनेशियाच्या सोस्टार अंदारू रिनाल्डीवर 144-142 अशी मात केली. जाधवने पहिला सेट जिंकला, पण गणेशने लगेचच बरोबरी साधली. पुढील दोन सेट त्यांनी विभागून घेतले. निर्णायक पाचव्या सेटमध्ये, गणेशने दोन 10 आणि एका एक्सच्या जोरावर विजय मिळवला, तर जाधवने एक आणि एक 10 नंतर 9 गुण मिळवले. गणेशचा पुढील सामना चायनीज तैपेईच्या चिएह-लुन चेनशी होईल.

Advertisement

Advertisement
Tags :

.