महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अर्चना घारे -परब शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत

12:06 PM Nov 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिपावली पाडव्याचे औचित्य

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस परिवाराचा दिपावली पाडवा दर वर्षी बारामतीत साजरा होत असतो. दिपावली पाडव्याचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक शरद पवार साहेबांची भेट घेण्यासाठी, त्यांचे शुभाशीर्वाद घेण्यासाठी बारामतीला येतात. शरद पवारही आलेल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घेऊन आपुलकीने विचारपूस करतात. एखाद्या राजकीय पक्षातील कौटुंबिक जिव्हाळ्याचे हे एकमेवद्वितीय उदाहरण आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग अध्यक्ष सौ. अर्चना घारे परब यांनीही दिपावली पाडव्याच्या निमित्ताने सहकुटुंब बारामतीला भेट देत शरद पवार साहेब व खासदार. सौ. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. "दर वर्षी दिपावली पाडव्याला आम्ही बारामतीत येऊन आमच्या दैवताचे दर्शन घेतो, त्यांचे आशीर्वाद घेतो. यावर्षीही आदरणीय पवार साहेब व सुप्रियाताईंची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. ही भेट येत्या काळात मला ऊर्जा देणारी आहे." अशी भावना अर्चना घारे परब यांनी व्यक्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :
# archana ghare parab # ncp # sharad pawar # baramati # supriya sule
Next Article