राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी अर्चना घारे -परब
मुंबई । प्रतिनिधी
शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षपदी पुन्हा एकदा अर्चना घारे परब यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना नियुक्तीचे पत्र काल झालेल्या मुंबई येथे पक्षाच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व महिला प्रदेशाध्यक्ष ऍड. रोहिणी खडसे यांच्या हस्ते देण्यात आले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात अपक्ष निवडणूक सौ अर्चना परब यांनी लढवली होती.आता पक्षाने त्यांना पुन्हा एकदा पक्षात पाचारण करून कोकण विभागाची जबाबदारी सोपवली आहे.. सौ परब यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कोकणात पक्षाची बांधणी उत्तम केली होती. मात्र त्यांना महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये उमेदवारी मिळाली नव्हती . आता पक्षाला पुन्हा त्यांची आवश्यकता वाटल्याने त्यांना राजकारणात सक्रिय केले आहे. सौ परब आता पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय झाल्या आहेत .