Kolhapur Breaking : तावडे हॉटेलजवळील कमान आज रात्री पाडणार; वाहतुकीत बदल
तावडे हॉटेलजवळील कमान पाडण्यासाठी आज रात्री काम सुरू
कोल्हापूर : तावडे हॉटेल जवळची कमान ही धोकादायक झाली असल्यामुळे आज रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत महानगरपालिकेच्या वतीने ही कमान पाडण्यात येणार आहे...या कालावधीत परिसरातील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत ,
वाहतूक पोलिसांच्या मदतीने तावडे हॉटेल मार्गे कोल्हापुरात येणारी वाहतूक या कालावधीसाठी उचगाव मार्गे वळविण्यात आलेले आहे.. तसेच कोल्हापूर शहरातून तावडे हॉटेल मार्गे बाहेर जाणारी वाहतूक छत्रपती ताराराणी चौकातून बावडा रोडने शिये मार्गे वळवण्यात येणार आहे...
तरी या कालावधीमध्ये कोल्हापूर शहरात येणाऱ्या व शहरातून बाहेर जाणाऱ्या नागरिकांनी वाहतूक व्यवस्थेत केलेल्या बदलाची नोंद घेऊन प्रशासना सहकार्य करावे तसेच तसेच या काळात नागरिकांनी शक्यतो या मार्गाचा वापर टाळावा आणि पर्यायी मार्गांचा अवलंब करावा,आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेले आहे..