For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

LPG cylinder shortage | साताऱ्यात गॅस एजन्सीचा मनमानी कारभार; दोन महिने उलटले तरी सिलेंडर मिळेना, महिलांचा संताप अनावर

03:32 PM Apr 24, 2026 IST | NEETA POTDAR
lpg cylinder shortage   साताऱ्यात गॅस एजन्सीचा मनमानी कारभार  दोन महिने उलटले तरी सिलेंडर मिळेना  महिलांचा संताप अनावर
Advertisement

                                   साताऱ्यात गॅस एजन्सीचा कारभार कोलमडला

Advertisement

सातारा : शहरातील एका गॅस एजन्सीच्या कारभाराचा बोजवारा उडाल्याचे चित्र सध्या समोर येत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडर मिळत नसल्याने ग्राहकांनी एजन्सीसमोर अक्षरशः रांगा लावल्या असून, महिलांचा संताप अनाबर झाला आहे. ग्राहकांनी आपले रिकामे सिलिंडर ररत्याबर ओळीत ठेवून तासन्तास प्रतीक्षा सुरू ठेवली आहे. मात्र एवढ्या प्रतीक्षेनंतरही त्यांना गॅस मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत.

म्हणण्यानुसार, गॅस बुकिंगसाठी दिलेला दूरध्वनी क्रमांक कायमस्वरूपी बंद असतो. त्यामुळे एजन्सीवर प्रत्यक्ष जाऊन
विचारणा करणे हा एकमेव पर्याय उरतो. विशेष म्हणजे, एजन्सीतील कर्मचारी उद्धटपणे वागत असल्याचा गंभीर आरोप महिलांनी केला आहे. गॅस मिळणार नाही, जे करायचे ते करा, अशा प्रकारचीउडवाउडवीची उत्तरे देत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचे सांगितले जाते. काही ग्राहकांनी तर
धक्कादायक आरोप करत सांगितले की, नंबर लावूनही सिलिंडर दिला जात नाही आणि नंतर तो इतरांनादिल्याचे सांगितले जाते. यामागे काळाबाजाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

Advertisement

"एजन्सीच्या गाड्या नेमक्या कोणाला सिलिंडर देतात?" असा सवाल संतप्त नागरिक उपस्थित करत आहेत.ग्राहक विक्रम जराड यांनी सांगितले की, "एप्रिलमध्ये सिलिंडर देण्याचे लिखित आश्वासन दिले, मात्र तारीख वारंवार पुढे ढकलली जाते. जानेवारीपासून आजपर्यंत एकही सिलेंडर मिळालेला नाही." विशेष म्हणजे, इतर गॅस कंपन्या ग्राहकांना घरपोच सेवा देताना, केवळ एक एजन्सीच का अपयशी ठरत आहे, असा सवाल नागरिक करत जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली.

Advertisement
Tags :

.