कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अन्नपूर्णा नृत्योदय संस्थेतर्फे ‘अरंगेत्रम’ कार्यक्रम

11:09 AM May 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘लोकमान्य’च्या संचालक सई ठाकुर-बिजलानी यांची उपस्थिती 

Advertisement

पुणे : येथील अन्नपूर्णा नृत्योदय संस्थेच्यावतीने रामकृष्ण मोरे सभागृहात अरंगेत्रम या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या गुरु नीती नायर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या शिष्या सिद्धी शहा, श्रीया शहा, स्वरा चित्रोडा, ध्रुवी हेगडे, अनघा जोशी व निहारिका सिंग यांनी नृत्यरचना सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटीच्या संचालक सई ठाकुर-बिजलानी व गुरु सुचित्रा दाते उपस्थित होत्या. सई ठाकुर यांनी आजच्या तरुण पिढीला अभ्यासाइतकीच कला महत्त्वाची आहे. कला आपल्याला आनंद देते. आज संगीत व नृत्य कला प्रकारांना अतिशय महत्त्व आले असून त्यामध्ये करिअर घडविणे शक्य आहे, असे सांगून कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक केले. अरंगेत्रम हा तमिळ शब्द असून ‘मंचावर पहिली पावले’ असा त्याचा अर्थ होतो.

Advertisement

भरतनाट्याममधील शिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रथमच शिष्या सार्वजनिकरीत्या रंगमंचावर संपूर्ण एकल नृत्य सादर करून आपल्या गुरुचा आशीर्वाद घेतात. त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी सादरीकरण करू शकतात. अरंगेत्रममध्ये अलारिपु म्हणजेच ऊर्जा जागवणारे प्रारंभिक नृत्य जतीस्वरम-नृत्य आणि स्वरांची एकत्रित रचना, शब्दम-अभिनययुक्त नृत्य, वर्णम-सर्वाधिक जटिल आणि दीर्घ रचना अर्थात नृत्य आणि अभिनय यांचे परिपूर्ण मिश्रण, पदं-जावळी भक्तिप्रधान किंवा शृंगाररसातील अभिव्यक्तपूर्ण रचना, तिल्लाना- अंतिम लयबद्ध नृत्य, श्लोक- मंगलम समारोप सांगता. भरतनाट्याम सादरीकरणामध्ये मृदंग, घटम, बासरी, व्हायोलिन, नटुवंगम (ताल ठेवणारे झांज वाद्य व गायन) या सर्वांचा सहभाग असतो. संस्थेच्या या कार्यक्रमात नीती नायर, दृष्टी मंजल यांनी गायन केले. वेंकटेश (मृदंग), पंचम उपाध्याय (घटम), अजय चंद्रमौळी (व्हायोलिन) व संजय शशिधरन (बासरी) यांनी नर्तकांना उत्कृष्ट साथ दिली. या कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन नृपा सोमण यांनी केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article