For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपूर्वा बासूर; रवींद्र खेबुडकर यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी अपूर्वा बासूर  रवींद्र खेबुडकर यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली
Advertisement

सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) अपूर्वा बासूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांची भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

Advertisement

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी, 3 सप्टेंबर 2026 रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला. अपूर्वा बासूर सध्या पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी, जव्हार उपविभाग म्हणून कार्यरत आहेत.

शासनाच्या आदेशानुसार, रवींद्र खेबुडकर, भाप्रसे यांच्या जागी अपूर्वा बासूर यांची सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाची धुरा आता बासूर यांच्या हाती येणार आहे.

Advertisement

नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी बासूर यांनी त्यांच्या सध्याच्या पदाचा कार्यभार पी. के. सिद्धार्थ रामकुमार, भाप्रसे यांच्याकडे सोपवावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार रवींद्र खेबुडकर यांच्याकडून तातडीने स्वीकारावा, असेही शासन आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, रवींद्र खेबुडकर यांच्या बदलीमुळे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय नेतृत्वात बदल झाला असून, अपूर्वा बासूर यांच्या नियुक्तीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.