For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आपटा पोलीस चौक ठरतोय अपघाताला निमंत्रण

01:46 PM Jul 21, 2025 IST | Radhika Patil
आपटा पोलीस चौक ठरतोय अपघाताला निमंत्रण
Advertisement

सांगली / संजय गायकवाड :

Advertisement

सांगली शहरातील अरूंद रस्ते आणि अरूंद चौकामध्ये सर्वात वरच्या क्रमांकावर असणारा चौक म्हणून आपटा पोलीस चौकाची नोंद घ्यावी लागेल. बेशिस्त वाहनचालक आणि अतिशय अरुंद चौक यामुळे या चौकातील वाहतुकीचा बट्ट्याबोळ झाला आहे. महापालिका प्रशासन या नात्याने आयुक्त सत्यम गांधी याही चौकाची प्रत्यक्ष पाहणी करून आपटा पोलीस चौकाला शिस्त लावण्याची नितांत आवश्यकता आहे.

सांगलीतील अपवाद वगळता बहुतांश पोलीस चौक्या बंद अवस्थेतच आहेत. आपटा पोलीस चौकीच्या ठिकाणी काही पोलीस कर्मचारी हजर असतात. पण विविध कामाच्या निमित्ताने लोक थेट पोलीस ठाण्यातच जात असल्याने पोलीस चौक्यांशी लोकांचा फारसा संपर्क येत नाही. तरीही सांगली पोलीसांनी शहरातील काही पोलीस चौक्या सुरू ठेवल्या आहेत. हे विशेष आपटा पोलीस चौकी ही त्यातील एक आहे. आपटा पोलीस चौकीजवळील चौक हा सांगलीतील वर्दळीचा व गर्दीचा चौक आहे.

Advertisement

या चौकाला काँग्रेस कमिटीकडून आलेला रोड, काळया खणीकडून आलेला रोड, कॉलेज कॉर्नरकडून आलेला रोड, उत्तर शिवाजीनगरकडून आलेला रोड, रेल्वेस्टेशनकडून आलेला रोड, सांगली जिमखान्याकडून आलेला रोड असे अनेक रोड या चौकात एकत्र आलेले आहेत. माधवनगर, तासगाव, विटा, आटपाडी या भागाकडे जाणाऱ्या व तिकडून येणाऱ्या एसटी बसेस या आपटा पोलीस चौकीपासून काँग्रेस कमिटीकडून सांगली शहरात प्रवेश करतात. त्याशिवाय काळया खणीकडून येणाऱ्या वाहनांचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. ही सर्व वाहने याच चौकातून पुढे जात असतात.

मुळातच आपटा पोलीस चौकी हा चौक अरूंद आहे. त्यामुळे या चौकातून कॉलेज कॉर्नरकडे एसटी गाडया वळताना समोरील सर्व वाहने ही थांबवावीच लागतात. त्याशिवाय या चौकातून मोठी वाहने वळू शकत नाहीत. तसेच काळया खणीकडून येणारी वाहने वेगाने येतात. त्याचवेळी उत्तर शिवाजीनगर आणि रेल्वेस्टेशनकडील रोडने येणारे दुचाकीस्वार, रिक्षा आदी वाहने ही या चौकातून वेगाने चौक पार वाहनाना ब्रेक लागला करण्याचा प्रयत्न करतात. नाही तर येथे हमखासपणे अपघात होतात.

सांगली शहरातील विशेषतः दुचाकीस्वारांना अजिबात शिस्त नाही, अनेकजण वाहतुकीचे नियम पाळत नाहीत. एका दुचाकीवरून तिघेजण तर काही गाडयावर चौघेजण जाणारेही महाभाग शहरात आहेत. अशावेळी वाहतुक पोलीस तर काय करणार, कॉलेज कॉर्नरला दोन दिवसापुर्वी एका पोलीसांने अशा एका तिघांना पकडले पण दुचाकीवरून जाणाऱ्या त्या तरूणांनी येथे गाडी न थांबवता ते तसेच आपटा पोलीस चौकीच्या दिशेने पळून गेले. वाहतुक पोलीसांनी गाडीचा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत ते तिघेजण खूपच पुढे निघून गेले होते. आपटा पोलीस चौकी ते कॉलेज कॉर्नर या दरम्यान असे प्रकार खूपच होतात.

आपटा पोलीस चौकी चौकाचे रूंदीकरण करण्याची आवश्यकता आहे. किमान बाजूची काही झाडे आणि छोटी मोठी अतिक्रमणे हटवून हा चौक आणखी थोडासा मोठा करता येऊ शकतो. याबाबत मनपाने निर्णय घ्यायचा आहे. पण केवळ चौक मोठा करून ही समस्या सुटणार नाही. सांगलीकर लोक आणि वाहनचालक यांनीही काही तरी शिस्त बाळगली पाहिजे. कोणी पण काहीही केले तर त्याला मनपा आणि वाहतुक पोलीस तर काय करणार, मुळातच सांगलीमध्ये पार्कीगसाठी चांगल्या जागा नाहीत. त्यामुळे लोक कुठेही कशाही गाडया लावतात. त्यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या वाहनांना अडथळा होतो.

आपटा पोलीस चौकीपासून कॉलेज कॉर्नरपर्यंत दोन्ही बाजूनी असणारी दुकाने, बँका, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, हातगाडया चहाची दुकाने यांच्यासमोर येथे मोठ्या प्रमाणात दुचाकी गाडया उभ्या राहिलेल्या असतात. मग तिकडे वाहतुकीला अडथळे होतात.

महापालिकेला फेरीवाला धोरण आणि अतिक्रमण हटाव मोहिम राबविताना या रोडवरील वाहनचालकांना शिस्त आणि आपटा पोलीस चौकी ते कॉलेज कॉर्नर या दरम्यान दोन्ही बाजूनी रस्त्यांच्या कडेला किमान पांढरे पट्टे मारून वाहनांची सोय करता येणे शक्य आहे.

Advertisement
Tags :

.