अॅप्सीस एरोकॉमचा समभाग सुचिबद्ध
06:47 AM Mar 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मुंबई:
Advertisement
अभियांत्रिकी क्षेत्रातील कंपनी अॅप्सीस एरोकॉम यांचा समभाग शेअर बाजारात बुधवारी सुचिबद्ध झाला. 110 रुपयाच्या इशुकिंमतीच्या तुलनेमध्ये समभाग एनएसई एसएमईवर 153 रुपयांवर सुचिबद्ध झाला. या आयपीओला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद नोंदविला होता. आयपीओला एकंदर 129 पट बोली लागली होती. सुचिबद्ध झालेल्या दिवशीच कंपनीचे समभाग खरेदी केलेल्या गुंतवणूकदारांना 39 टक्के इतका परतावा प्राप्त करता आला. कंपनी आयपीओच्या माध्यमातून 36 कोटी रुपये उभारणार आहे.
Advertisement
Advertisement