For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विद्यापीठ अंतर्गत 26, 27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या

06:30 PM Apr 23, 2024 IST | Abhijeet Khandekar
विद्यापीठ अंतर्गत 26  27 एप्रिलच्या परीक्षा पुढे ढकलल्या
Shivaji University
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुक प्रशिक्षण घेण्यासाठी जावे लागणार आहे. त्यामुळे मार्च-एप्रिल 2024 उन्हाळी सत्रातील 26 व 27 एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या दोन दिवसांचे पेपर संबंधीत अभ्यासक्रमाचा शेवटचा पेपर झाल्यावर होतील. या परीक्षांचे वेळापत्रक यथावकाश प्रसिध्द करण्यात येणार आहे, याची विद्यापीठ अधिविभाग, महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. तसेच विद्यार्थ्यांना पुढे ढकलण्यात आलेल्या पेपरची माहिती द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी परिपत्रकाव्दारे केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.