मालवणात हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्रास मंजूरी मिळावी
आमदार निलेश राणेंची पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे मागणी
मालवण | प्रतिनिधी : पणन मंडळाच्या माध्यमातून मालवण येथे आधुनिक हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राला मंजुरी मिळावी. अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी राजशिष्ठाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यात आमदार निलेश राणे यांनी याबाबत निवेदन देत आबा उत्पादकांच्या महत्वपूर्ण विषयावर चर्चा केली. त्याला मंत्री रावल यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, कोकणात मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादित केला जातो, उत्पादित आंबा निर्यात व्हावा यासाठी कोकणात पणन मंडळाची दोन निर्यात सुविधा केंद्रे आहेत. त्यात रत्नागिरी नाचणे येथील हापूस आंबा निर्यात केंद्र व देवगड येथील हापूस आंबा निर्यात केंद्र यांचा समावेश आहे. माझ्या मतदारसंघातील मालवण तालुक्यातुनही मोठ्या प्रमाणात आंबा उत्पादित केला जातो, जर मालवण येथे हाऊस आंबा निर्यात सुविधा केंद्राच्या माध्यमातून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना राउपनिंग चेंबर, हाताळणी यंत्रणा, शीतगृह यासारखी यंत्रणा उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणात आंबा निर्यात शक्य होईल.तरी पणन मंडळाच्या माध्यमातून मालवण येथे आधुनिक हापूस आंबा निर्यात सुविधा केंद्राला मंजुरी द्यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.