For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘व्हिआय’च्या एफपीओसाठी प्रति इक्विटी समभाग 11 रुपयाच्या ऑफरला मंजुरी

06:54 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘व्हिआय’च्या एफपीओसाठी प्रति इक्विटी समभाग 11 रुपयाच्या ऑफरला मंजुरी
Advertisement

18,000 कोटींचा एफपीओच्या अंतर्गत मिळाली मान्यता

Advertisement

नवी दिल्ली :

आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या व्होडाफोन आयडिया लिमिटेड (व्हीआय) या दूरसंचार कंपनीच्या एफपीओने खळबळ उडवून दिली आहे. आता दूरसंचार कंपनीच्या संचालक मंडळाने त्यांच्या 18,000 कोटीच्या एफपीओ अंतर्गत 11 रुपये  प्रति इक्विटी शेअरवर ऑफर किंमत निश्चित केली आहे, अशी माहिती कंपनीने शेअर बाजाराला दिली आहे.

Advertisement

व्होडाफोन आयडियाने सांगितले की संचालक मंडळाने अँकर गुंतवणूकदारांसाठी प्रति इक्विटी शेअर 11 रुपये या ऑफर किंमतीलाही मान्यता दिली आहे. ‘पुढील ठराव देखील संमत करण्यात आले...

? प्रति इक्विटी शेअर  11 च्या ऑफर किमतीला मान्यता देणे...

? प्रति इक्विटी शेअर रु 11 या अँकर गुंतवणूकदाराच्या ऑफर किमतीला मान्यता देणे.

किती सबस्क्रिप्शन मिळाले?

कंपनीच्या एफपीओला 6.4 पट सबक्रिप्शन मिळाले आणि गुंतवणूकदारांनी सुमारे 90,000 कोटी रुपयांच्या बोली लावल्या. या एफपीओमध्ये, पात्र संस्थात्मक खरेदीदार श्रेणीला 17.6 पट सबक्रिप्शन मिळाले.

मुख्य गुंतवणूकदारांनी 5000 कोटींहून अधिक रक्कम उभारली

व्होडाफोन आयडियाने 5,400 कोटी रुपये उभारण्यासाठी अँकर गुंतवणूकदारांना प्रति शेअर 11 रुपये (प्राइस बँडचा टॉप-एंड) 4.9 अब्ज शेअर्स वाटप केले आहेत.

Advertisement
Tags :

.