For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझटरी’च्या आयपीओला मान्यता

06:14 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझटरी’च्या आयपीओला मान्यता
Advertisement

सेबीचा हिरवा कंदील : 5.72 कोटी समभाग विकणार

Advertisement

मुंबई :

बाजार नियामक सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ने नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या आयपीओला मंजुरी दिली आहे. देशातील सर्वात मोठ्या डिपॉझिटरीची ही प्रारंभिक सार्वजनिक प्रस्ताव विक्रीची ऑफर असेल म्हणजेच आयपीओ आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस  नुसार, कंपनीच्या 6 विद्यमान भागधारकांद्वारे 5.72 कोटी शेअर्स विकले जाणार आहेत.

Advertisement

आयडीबीआय बँक 2.22 कोटी शेअर्स विकणार आहे, नॅशनल स्टॉक एक्सचेंज 1.80 कोटी शेअर्स विकेल, युनियन बँक 56.25 लाख शेअर्स विकेल, स्पेसिफाइड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया 34.15 लाख शेअर्स विकणार असल्याचे सांगितले जात आहे. तर स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एचडीएफसी प्रत्येकी 40 लाख शेअर्स विकणार आहेत.

एनएसडीएल ही देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी कंपनी आहे. देशात एनएसडी आणि सीडीएसएल या 2 डिपॉझिटरी कंपन्या आहेत. सीडीएसएल म्हणजेच सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड स्टॉक एक्सचेंजवर प्रथम सूचीबद्ध आहे. एनएसडीएल ही देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी कंपनी आहे, जी दीर्घकाळापासून आयपीओसाठी तयारी करत आहे.

Advertisement
Tags :

.