महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ईपीएफओ ठेवींवरील व्याजदरवाढीला मंजुरी

07:00 AM Jul 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अर्थसंकल्पापूर्वी केंद्र सरकारची भेट, 2023-24 साठी 8.25 टक्क्यांवर शिक्कामोर्तब : 7 कोटी कर्मचाऱ्यांना लाभ

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अर्थसंकल्पापूर्वी सुमारे 7 कोटी ईपीएफओ सदस्यांसाठी मोठी खूशखबर मिळाली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने गुरुवारी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) ठेवींच्या व्याजात वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. यावषी फेब्रुवारीमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 8.25 टक्के व्याजदर जाहीर केला होता. यासंबंधीच्या प्रस्तावाला आता केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिल्यामुळे चालू आर्थिक वर्षासाठी त्यात 0.10 टक्क्यांनी वाढ केल्याने कोट्यावधी कर्मचाऱ्यांना वाढीव दराने व्याज जमा होणार आहे.

2023-24 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदरात यापूर्वीच वाढ करण्यात आली आहे. कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांच्या अध्यक्षतेखालील ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने फेब्रुवारी महिन्यात 235 व्या बैठकीत प्रस्तावित व्याजदराला मंजुरी दिली होती. या निर्णयानंतर 2023-24 साठी पीएफ ठेवींवरील व्याजदर वाढीसंदर्भातील प्रस्ताव संमतीसाठी वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला होता. आता त्याला मान्यता देण्यात आली आहे. आता याचा फायदा देशभरातील सात कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना होणार आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी निश्चित करण्यात आलेला 8.25 टक्के हा व्याजदर मागील तीन वर्षांतील सर्वोच्च व्याजदर आहे. 2021-22 मध्ये ईपीएफवरील व्याजदर 8.10 टक्क्मयांपर्यंत खाली आणण्यात आला होता. हा दर गेल्या चार दशकातील सर्वात कमी व्याजदर होता. त्यानंतर मार्च 2023 मध्ये 2022-23 साठी ईपीएफवरील व्याजदर 8.15 टक्के जाहीर केला होता. यापूर्वी मार्च 2020 मध्ये भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजदर 2018-19 साठी 8.65 टक्क्मयांवरून 2019-20 साठी 8.50 टक्के या सात वर्षांच्या नीचांकी पातळीवर आणले होते.

अर्थ मंत्रालयाची संमती अत्यावश्यक

ईपीएफ ठेवींवरील व्याजदर निश्चित झाल्यानंतर त्याला अर्थ मंत्रालयाकडून संमती मिळण्याची नितांत आवश्यकता असते. सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर व्याजदराची अंमलबजावणी होते. आता सदर प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाल्याने 7 कोटींहून अधिक ग्राहकांच्या खात्यात व्याज जमा केले जाईल.

वीस किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या संस्थांमधील पगारदार कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योगदान अनिवार्य आहे. या अंतर्गत, कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 12 टक्के रक्कम मासिक आधारावर ईपीएफ खात्यात जमा केली जाते. तेवढेच योगदान नियोक्त्याद्वारे केले जाते. नियोक्त्याच्या वाट्यापैकी 3.67 टक्के रक्कम ईपीएफ खात्यात आणि उर्वरित 8.33 टक्के कर्मचारी पेन्शन योजनेत (ईपीएस) जमा केली जाते.

सद्यस्थितीत देशभरात मोठ्या प्रमाणात कर्मचारी ईपीएफओ सदस्य आहेत. सदर कर्मचारी आपल्या पीएफ खात्याची सध्याची शिल्लक रक्कम घरबसल्या सोप्या पद्धतीने तपासू शकतात. यासाठी अनेक पर्याय देण्यात आले आहेत. उमंग अॅप, वेबसाईट किंवा आपल्या मोबाईल फोनवरून एसएमएस पाठवून देखील पीएफ खातेदार आपली रक्कम जाणून घेऊ शकतो.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article