For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहराच्या विकासासाठी नवीन मास्टर प्लॅनला मान्यता

06:58 AM Jun 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहराच्या विकासासाठी नवीन मास्टर प्लॅनला मान्यता
Advertisement

बुडाच्या बैठकीत मंजुरी

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शहराचा भौतिकरित्या व तंत्रज्ञानावर आधारीत विकासासाठी मास्टरप्लॅन तयार करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शहराच्या विकासासाठी विविध योजना राबविणे गरजेचे आहे. त्यासाठी लवकरच नियोजन करा व त्या योजना राबविण्यास सुरुवात करा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री व पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी महानगरपालिका व बुडाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

Advertisement

शहर नगरविकास प्राधिकारण कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. या बैठकीला महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू सेठ, बुडा अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

शहरात नवीन लेआऊट राबविण्यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पावले उचलावीत. पाणी, ड्रेनेज, कचऱ्याची विल्हेवाट, तसेच वाहतूक नियोजनासाठी विविध क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. जेणेकरून भविष्यात या समस्या निर्माण होणार नाहीत. याकडे लक्ष देण्याची सूचना त्यांनी केली.

शहर व परिसरात असलेल्या लेआऊटमध्ये रस्ते, नाले, उद्याने व इतर सुविधा निर्माण करणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी बुडाने योग्यप्रकारे करावी. कोणीही लेआऊट करत असतील तर त्यांना नियमानुसारच परवानगी द्यावी. कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर कामे होता कामा नये. बेकायदेशीर वसाहती होऊ नयेत याकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नवीन मैदाने बांधणे, निवासी लेआऊटला मंजुरी देताना योग्य तो सर्व्हे करावा. नियमांच्या अंमलबजावणीमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होऊ नये, असे सांगितले.

या बैठकीला उपस्थित असलेले जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी कणबर्गी येथील लेआऊटच्या विकासासाठी निधी उपलब्ध आहे. काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत ही योजना राबविण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असल्याचे बैठकीत स्पष्ट केले.

अशोक सर्कल येथे पार्किंगसाठी विकास योजना राबविण्यासाठी बैठकीत मंजुरी देण्यात आली. फेब्रुवारी ते मे महिन्यांतील जमा-खर्चाला अनुमोदन देण्यात आले. द्वितीय दर्जा साहाय्यक म्हणून काम करत असलेल्या शंकर आर. बजंत्री यांना बढती देण्यात आली आहे. याचबरोबर इतर काही जणांनी लेआऊट, तसेच विविध कामांसाठी अर्ज केले होते. त्यांचे अर्जही या बैठकीत निकालात काढण्यात आले. या बैठकीला मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यासह बुडाचे अधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.