For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोमेकॉत ‘एमबीबीएस’च्या 50 जागा वाढविण्यास मान्यता

07:45 AM Jul 14, 2026 IST | Tarun Bharat Portal
गोमेकॉत ‘एमबीबीएस’च्या 50 जागा वाढविण्यास मान्यता
Advertisement

त. भा. प्रतिनिधी

Advertisement

पणजी : राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (नॅशनल मेडिकल कमिशन) गोवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलसाठी एमबीबीएसच्या आणखी 50 जागा वाढवण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे तेथील एकूण जागांची संख्या आता 200 वरुन 250 झाली आहे. चालू 2026-27 या वर्षापासूनच त्या 50 जागांची (एकूण 250) कार्यवाही होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

आज रुग्णवाहिका प्रदान सोहळा

Advertisement

दरम्यान, आरोग्य सेवेसाठी नवीन 19 वाहने आरोग्य खात्याच्या ताफ्यात सामील होणार असून त्याकरिता गोमेकॉच्या सुपर स्पेशालिटी विभागात पहिला माळा परिषदगृहात सकाळी 11 वा. कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तत्पूर्वी वाहने प्रदान करण्याचा सोहळा सुपर स्पेशालिटी विभागासमोर आयोजित करण्यात आला असून तो सकाळी 10.30 वा. होणार आहे. यावेळी केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजित राणे आणि इतर मान्यवर मंडळी हजेरी लावणार आहेत. ही वाहने म्हणजे 108 रुग्णवाहिका असून त्यांचा लाभ गोमंतकीय जनतेसाठी होणार आहे.

एनटीपीसी लिमिटेड, आरोग्य सेवा संचालनालय व गोवा सीएसआर प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एनटीपीसीच्या एचआर वंदना चतुर्वेदी त्यावेळी उपस्थित राहाणार आहेत.

Advertisement
Tags :

.