For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सरकारी पुनर्विकास प्रकल्पांना एफएआर वाढीस मंजुरी

05:19 PM May 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
सरकारी पुनर्विकास प्रकल्पांना एफएआर वाढीस मंजुरी
Advertisement

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती

Advertisement

पणजी : राजधानीतील प्रमुख सरकारी पुनर्विकास प्रकल्पांसाठी फ्लोअर एरिया रेशो (एफएआर) म्हणजे मजला क्षेत्र प्रमाण वाढविण्यास राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. या मंजुरीमध्ये राजधानीतील सर्वात जुन्या जुन्ता हाऊस प्रकल्पासह सांत इनेज येथील सरकारी निवासी गाळ्यांच्या पुनर्बांधणीचा समावेश आहे. अशाप्रकारे एफएआरमधील वाढीमुळे पायाभूत सुविधांच्या नियोजनात सुधारणा तर होणारच आहे, त्याशिवाय राजधानीतील प्रमुख सरकारी मालमत्तांच्या पुनर्विकासाला पाठिंबा मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. हे प्रकल्प पणजीतील सार्वजनिक पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि शहरी सुविधा वाढविण्याच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. प्रस्तावित पुनर्विकास उपक्रमांमुळे शहरातील सरकारी गृहनिर्माण आणि प्रशासकीय पायाभूत सुविधा अद्ययावत करण्याबरोबरच उपलब्ध जमिनीचा अधिक चांगला वापर होण्यास हातभार लागेल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

Advertisement
Advertisement
Tags :

.