For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्ली मेट्रोच्या दोन कॉरिडॉरना मंजुरी

06:43 AM Mar 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
दिल्ली मेट्रोच्या दोन कॉरिडॉरना मंजुरी
Advertisement

8,400 कोटींच्या चौथ्या टप्प्याला ग्रीन सिग्नल : केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्र सरकारने दिल्ली मेट्रोसाठी दोन नवीन कॉरिडॉर मंजूर केले असून त्यावर 8,400 कोटी ऊपये खर्च केले जाणार आहेत. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी बुधवारी दिल्ली मेट्रोच्या चौथ्या टप्प्याची घोषणा केली. दिल्ली मेट्रोच्या या विस्ताराला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. राष्ट्रीय राजधानीत दोन नवीन मेट्रो कॉरिडॉर बांधले जाणार आहेत. एक कॉरिडॉर लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉक असेल आणि दुसरा कॉरिडॉर इंद्रप्रस्थ ते इंद्रलोक असा असणार आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिल्ली मेट्रोच्या विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली. लाजपत नगर ते साकेत जी ब्लॉकपर्यंत 8.4 किलोमीटरचा मेट्रो कॉरिडॉर तयार केला जाईल. त्यात 8 स्थानके असून ती संपूर्ण एलिव्हेटेड लाईन असणार आहे. तसेच इंद्रलोक ते इंद्रप्रस्थ असा सुमारे 12.4 किलोमीटरचा दुसरा मेट्रो मार्ग असेल. हे दोन्ही टप्पे मार्च 2029 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.

दोन कॉरिडॉरचा एकूण प्रकल्प खर्च 8,399 कोटी ऊपये असून केंद्र आणि दिल्ली सरकार आणि आंतरराष्ट्रीय निधी एजन्सींच्या माध्यमातून हा निधी खर्च केला जाणार आहे. या दोन्ही नव्या लाईन्स एकूण 20.762 किमी अंतराच्या आहेत, असेही केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले.

दिल्ली मेट्रोचे जाळे विस्तारले

दिल्ली मेट्रो आता जगातील सर्वात मोठ्या मेट्रो नेटवर्कपैकी एक आहे. सध्या दिल्ली मेट्रोचे नेटवर्क एनसीआरच्या 34 किमी आरआरटीएस नेटवर्कसह सुमारे 427 किमीपर्यंत विस्तारले आहे. सध्या दिल्लीत 392.44 किमीच्या नेटवर्कवर मेट्रो चालवली जात आहे, ज्यात एनसीआरमधील 12 कॉरिडॉरचा समावेश आहे. दिल्ली मेट्रोने दररोज 60 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. ही राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची जीवनरेखा बनली आहे.

Advertisement
Tags :

.