कल्पतरु लिमीटेडच्या आयपीओला मंजुरी
नवी दिल्ली : बांधकाम क्षेत्रातील कंपनी कल्पतरु लिमीटेड यांना आयपीओ सादरीकरणासाठी मंजुरी मिळाली आहे. बाजारातील नियामक संस्था सेबी यांच्याकडून आयपीओ सादर करण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. कंपनी आयपीओअंतर्गत 1590 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते. या आयपीओत कंपनी ताजे समभाग सादर करणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात आलेली रक्कम आधीचे कर्ज फेडण्यासाठी त्याचप्रमाणे इतर कामांसाठी वापरली जाणार आहे. कंपनीने 14 ऑगस्ट रोजी आयपीओ सादरीकरणासंदर्भातला रितसर अर्ज सेबीकडे दाखल केला होता. कंपनी लक्झरी प्रीमीयम आणि मध्यम उत्पन्न गटातील ग्राहकांकरिता रहिवासी, व्यावसायिक आणि रिटेल प्रोजेक्ट राबविते. मुंबई महानगर क्षेत्र, पुणे या सोबतच हैद्राबाद आणि नोएडामध्ये कंपनीचे दोन प्रकल्प सुरु आहेत. नागपूरमध्ये नवा प्रकल्प राबविण्याचीही योजना कंपनीने आखली आहे. विविध शहरांमध्ये कंपनीचे अंदाजे 113 प्रकल्प आहेत, अशी माहिती मिळते आहे.