विनियोग विधेयक सभागृहात संमत
अनेक विधेयकांना मान्यता : हिवाळी विधानसभा अधिवेशनाचा समारोप
पणजी : अनुदानित मागण्या 2025-2026 वर्षाच्या खर्चाला मान्यता देणाऱ्या गोवा विनियोग विधेयक 2026 विधानसभा सभागृहात संमत करून हिवाळी विधानसभा अधिवेशनाचा समारोप करण्यात आला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विनियोग विधेयक 2026 सादर करून ते सभागृहात संमत केले. गोवा विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने 12 जानेवारीला सुरुवात झाली होती. हे अधिवेशन पाच दिवस चालले. काही दिवस खासगी ठरावाच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. तसेच सरकारी विधेयकेही संमत करण्यात आली. मोपा विमानतळ विकास प्राधिकरण दुऊस्ती विधेयक संमत करण्यात आले. मोपा विमानतळावर कायमस्वऊपी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची तरतूद विधेयकामध्ये आहे.
याशिवाय गोवा कोळसा व्यवस्थापन दुऊस्ती विधेयक, गोवा जनविश्वास दुऊस्ती विधेयक, पणजी महापालिका दुऊस्ती विधेयक, गोवा नगरपालिका दुऊस्ती विधेयक यांना सभागृहात मान्यता देण्यात आली. कोळसा व्यवस्थापनासाठी सरकारने डिपॉझीट रिफंड योजना सुरू केली आहे. या योजनेच्या कार्यवाहीसाठी प्राधिकरण स्थापन करण्याची तरतूद या विधेयकामध्ये आहे. भू महसूल संहिताप्रमाणे पणजी महापालिकेत येणारे बांधकाम वा इमारत सर्व्हेमध्ये दाखविले त्याला महापालिका आयुक्तांचा परवाना आहे, असे गृहीत धरण्याची तरतूद पणजी महापालिका दुरूस्ती विधेयकात आहे. भू महसूल संहिता 1968 खाली जी इमारत किंवा बांधकाम नगरपालिका क्षेत्रात आहे ते मुख्याधिकाऱ्यांच्या मान्यतेने उभारण्यात आले अशी तरतूद करणारे हे विधेयक आहे. नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांनी विधानसभा सभागृहात मांडून ते संमत केले.