लेखानुदान विनियोग विधेयक घाईघाईने संमत
पणजी : अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लेखानुदान विनियोग विधेयक विधानसभेत मांडले. मात्र ते घाईघाईने संमत करण्याचा प्रयत्न सरकारतर्फे सुरू झाला तेव्हा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी त्यावर चर्चेची मागणी केली. तसेच बोलण्याची संमती मागितली. त्याकडे सभापती रमेश तवडकर तसेच डॉ. सावंत यांनी दुर्लक्ष केले. ही सालाझारशाही असल्याचा आरोप करून आलेमाव, सरदेसाई यांच्यासह काँग्रेस, आप व आरजीचे आमदार सभापतींच्या आसनासमोर आले आणि त्यांनी चर्चा मागितली. त्याच गोंधळात सभापती तवडकर यांनी कामकाज चालू ठेवले. तसेच लेखानुदान विनियोग विधेयक संमत झाल्याचे झाहीर केले. समारोप करताना तवडकर यांनी अधिवेशनाबाबत आपली टिपणी थोडक्यात सादर केली. हे सर्व चालू असतानाच विरोधी आमदार समारोप निषेध नोंदवत होते. शेवटी तवडकर यांनी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित केले. राष्ट्रगीताची धून वाजली तेव्हा विरोधी आमदारांकडे गप्प राहून स्तब्ध रहाण्याशिवाय पर्याय राहिला नाही. शेवटचा दिवस असल्याने बहुतेक कामकाज घाईघाईने उरकण्यात आले.
सर्वाधिक वीज खात्याचा अर्थसंकल्प
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या खात्याने सर्वाधिक रु. 4132.15 कोटीची तरदूत प्राप्त करून मोठी बाजी मारल्याचे दिसून आले. या अर्थसंकल्पात वीज खात्याएवढा निधी कोणत्याही इतर खत्याच्या वाट्याला आला नाही. भूमिगत केबल, हरीत आणि अपारंपरिक उर्जेचे प्रकल्प, सौर उर्जा यासाठी वीज खत्याला सर्वांधिक निधी देणे सरकारला भाग पडले आहे. वीज खात्यासाठी मोठी गुंतवणूक करावी लागते आणि खर्चही जास्त होतो म्हणून वरीलप्रमाणी मोठ्या रकमेची तरदूत करण्याशिवाय सरकारकडे पर्याय सरकारकडे पर्याय नसल्याचे अर्थसंकपातून स्पष्ट झाले.