For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तळेरे आणि वेंगुर्ले महाविद्यालयात सुरू होणार 'अप्रेंटिस ओरिएंटल पदवी'; मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची घोषणा

तळेरे आणि वेंगुर्ले महाविद्यालयात सुरू होणार  अप्रेंटिस ओरिएंटल पदवी   मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंची घोषणा
Advertisement

सावंतवाडी वार्ताहर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे आणि वेंगुर्ले येथील महाविद्यालयांमध्ये लवकरच ‘अप्रेंटिस ओरिएंटेड पदवी’ अर्थात शिकाऊ उमेदवारीवर आधारित रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केली. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

Advertisement

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत प्रत्यक्ष उद्योगांमध्ये कामाचा अनुभव मिळणार आहे. पदवीच्या अंतिम वर्षात सहा महिने विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये ऑन-द-जॉब ट्रेनिंग घ्यावे लागणार असून, त्यांना नियमानुसार स्टायपेंडही मिळणार आहे. पर्यटन, मत्स्य व औद्योगिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची रचना करण्यात आली आहे.

स्वायत्त महाविद्यालयांबाबत पालकांनी गैरसमज बाळगू नये. स्वायत्त महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नच राहतात आणि पदवी प्रमाणपत्रावर मुंबई विद्यापीठाचे नाव व लोगो कायम असतो, असे डॉ. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

Advertisement

दरम्यान, सावंतवाडी येथे मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पत्रकार परिषदेला संस्थेचे लखमराजे भोसले, प्राचार्य दिलीप भारमल व प्रा. गणेश मर्गज उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.