For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वकार युनूसची मेंटरपदी नियुक्ती

06:46 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
वकार युनूसची मेंटरपदी नियुक्ती
Advertisement

वृत्तसंस्था/लाहोर

Advertisement

पाकमधील फैसलाबाद येथे 12 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी पाक क्रिकेट संघाच्या मेंटरपदी माजी वेगवान गोलंदाज वकार युनुसची नियुक्ती करण्यात आली आहे.

या महत्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेसाठी पाक संघाकडून कसून सराव करवून घेतला जात आहे. पाक संघाकरिता पाच मेंटर्सची नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये वकार युनुसचा समावेश आहे. पाक संघासाठी वकार युनुस, मिसबाह उल हक्क, सकलेन मुस्ताक, सर्फराज अहमद आणि शोएब मलिक हे पाच मेंटर्स आहेत. पीसीबीने या पाच मेंटर्सबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. यापूर्वी वकार युनुस पीसीबीचे चेअरमन मोहसीन नक्वी यांचे सल्लागार म्हणून कार्यरत होता. नियुक्त करण्यात आलेले हे पाच मेंटर्स पाक संघातील खेळाडूंकडून कसून सराव करवून घेत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.